Pune Crime News | ‘तुला आंदेकरच्या ऑफिसला नेऊन दाखवते मी कोण आहे ते’; महिला पोलिसांना स्टॉलधारक महिलेने दिली धमकी

पुणे : Pune Crime News | श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीला (Dagdusheth Ganpati) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह व्हिआयपी लोक दर्शनासाठी भेट देणार असल्याचे फुटपाथवर वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल काढून घेत असताना दोन महिलांनी महिला पोलिसांच्या कॉलरला पकडून गणवेशाच्या शर्टची दोन बटणे तोडली. तर तिसर्या महिलेने आंदेकरच्या ऑफीसला नेऊन तुला दाखवते मी कोण आहे ते, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी महिला पोलीस शिपाई अश्विनी बनसोडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उमा राजेंद्र रणदिवे (वय ३४), रोशनी राजेंद्र रणदिवे (वय १९, रा. धनकवडी) या मायलेकीसह तीन महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बेलबाग चौकातील मुळचंद दुकानाचे कॉर्नरलगत सोमवारी सांयकाळी सव्वा सहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार सपकाळ, पोलीस हवालदार सय्यद यांच्यासह व्हीव्हीआयपी मुव्हमेंटमध्ये अडथळा होऊ नये, म्हणून बेलबाग चौक (Belbaug Chowk Pune) परिसरातील व शिवाजी रोडवरील हॉकर्स तसेच फुटपाथवरील वेगवेगळ्या वस्तुंचे स्टॉल काढून घेत होत्या.
यावेळी फुटपाथवर बांगड्या विकणार्या या मुलीने त्यांना शिवीगाळ करुन तू पोलीस आहेस, म्हणून दादागिरी करीत आहेस का, असे मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्या ठिकाणी अडथळा होऊ नये, म्हणून त्यांना पोलीस ठाण्यात येऊन जात असताना उमा रणदिवे हिने फिर्यादी यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला.
फिर्यादी यांच्या गणवेशाची कॉलर पकडून खाली खेचून शर्टाची दोन बटणे तोडून त्यांच्या शिलास हानी पोहोचवली.
फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र तोडून नुकसान केले.
त्यांच्याबरोबरच्या महिलेने “आंदेकरच्या ऑफीसला नेऊन तुला दाखवते मी कोण आहे ते,”
अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.
वेगळा Video –
https://www.instagram.com/p/DAAfSU_pxJC
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा