Veg Langar At Ajmer Sharif | पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यावरून ‘अजमेर दर्ग्या’मध्ये वाद

ऑनलाइन टीम – Veg Langar At Ajmer Sharif | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज (१७ सप्टेंबर) ७४ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने राजस्थानमधील अजमेर दर्गा शरीफ येथे ४००० किलोची खिचडी तयार करून गरजूंना वाटण्यात येणार आहे. मात्र या अन्नदान कार्यक्रमावरून सध्या दर्गाहमधील खादिम (दर्ग्याची काळजी घेणारे) यांच्यात अंतर्गत वाद सुरू झाला आहे. पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या जन्मदिनी अशाप्रकारचा कार्यक्रम आखला गेला आहे. जो राजकीय लाभ मिळवण्यासाठी असल्याचे काहींचे म्हणणे आहे तर, गरजूंना अन्नदान करण्याच्या हेतूने सदर कार्यक्रम आयोजित केला असून त्यातून कोणताही राजकीय अर्थ काढणे गैर आहे. असे काहींचे म्हणणे आहे.
अजमेर दर्गा शरीफचे सचिव सय्यद सरवार चिश्ती यांनी म्हटले की, दर्ग्यात अन्नदान कार्यक्रम याआधीही आयोजित करण्यात आलेले आहेत. मात्र यावेळी पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या जन्मदिनी अशाप्रकारचा कार्यक्रम आखला गेला आहे. आम्ही जन्मदिनानिमित्त अन्नदान करण्याच्या विरोधात नाहीत. मात्र यानिमित्त राजकीय लाभ घेण्यास आमचा विरोध आहे. काही खादिमना भाजपाकडून राजकीय लाभ हवा आहे, त्यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या सर्व घटकातील लोक याठिकाणी दर्शनासाठी येतात, हे एक धर्मनिरपेक्ष स्थळ असल्यामुळे राजकीय कार्यक्रम दर्ग्यात करू नयेत.
दर्ग्यात राजकीय व्यक्ती स्वत: येऊन अन्नदान करू शकते
दर्ग्याच्या आवारात एखादा राजकीय कार्यक्रम घेण्यास परवानगी आहे का? असा प्रश्न विचारला असता अजमेर दर्गा शरीफचे सचिव सरवार चिश्ती यांनी दर्गाच्या आतमधील आवारात राजकीय कार्यक्रम घेण्यास कोणतीही परवानगी नाही, हे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “जर कुणी राजकीय व्यक्ती स्वतः येऊन दर्ग्यात अन्नदान करू इच्छित असेल. तर आम्ही त्याचे किंवा तिचे स्वागतच करू. मात्र सध्या दर्ग्यात जो कार्यक्रम घेतला जातोय, तो कुणाच्यातरी राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी घेतला जातोय. त्याला आम्ही विरोध करतो.”
मोदी देशाचे पंतप्रधान, कोणत्याही एका समाजाचे नेते नाही
अजमेर दर्ग्याचे गद्दीनशीन (प्रमुख) सय्यद अफसान चिश्ती हे या अन्नदानाचे आयोजन करत आहेत. ते म्हणाले की, त्यांच्या या आयोजनाबाबत त्यांना समितीमधील एकाही सदस्याने अद्याप विरोध दर्शविलेला नाही. अफसान चिश्ती म्हणाले, “भारतीय अल्पसंख्याक आणि चिश्ती फाऊंडेशन यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त अन्नदान आयोजित करण्यात आले आहे. आम्ही गरजूंना अन्नदान करणार आहोत, त्यामुळे यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ते कोणत्याही एका समाजाते नेते नाहीत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे शांतता आणि बंधुत्वाच्या नजरेने पाहावे.”
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा