Ganesh Visarjan Miravnuk Pune | पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रचंड उन्हामुळे भाविकांना आली चक्कर ! पहिल्या चार तासात 122 लोकांवर उपचार, ढोलचे टिपूर लागून ढोलवादक जखमी

Pune Police Vighnaharta Nyas

पुणे : Ganesh Visarjan Miravnuk Pune | पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. भरदुपारी प्रचंड उन्ह, गर्दी यामुळे अनेकांना विशेषत: महिलांना डिहायड्रेशनचा त्रास होऊन चक्कर आल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे पहिल्या चार तासात १२२ लोकांवर आपत्कालीन वैद्यकीय मदत देण्याची वेळ आली. ढोल पथकांनी काहींना ढोल वाजवत असताना टिपूर लागून जखमी झाल्याचे घटना मिरवणुकीदरम्यान घडल्या. ५ ते ६ ढोल वादक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/DAA8uNwJVbp

गणेश विसर्जन मिरवणुकीत पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास (Pune Police Vighnaharta Nyas) आपत्कालीन वैद्यकीय मदत पथकाच्या वतीने बेलबाग चौक, अलका टॉकीज चौक, एस पी कॉलेज चौक, पुरम चौक येथे रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याशिवाय लक्ष्मी रोडवरील गोखले हॉल, कुमठेकर रोडवर स्वीट होमजवळ, नारायण पेठ पोलीस चौकीजवळ आणि टिळक रोडवर एस पी कॉलेज चौकात आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

https://www.instagram.com/p/DAA__iEphrF

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत सुरुवातीच्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांचे विशेष आकर्षण असते. ही मिरवणुक पाहण्यास आणि गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करत असतात. आज आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा कडाका वाढला होता. गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. कसबा गणपतीसह अन्य मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी उन्हामध्ये गर्दीत थांबल्याने अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास झाला. त्यांना चक्कर येऊ लागली. काही महिला रोडवरच कोसळल्या. त्यांच्या आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्रात उपचार करण्यात आले. उन्हाचा त्रास झाल्याने पहिल्या चार तासात १२२ भाविकांवर उपचार करण्यात आल्याचे विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई (Dr. Milind Bhoi) यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAAmljpJcrW

ढोलवादन करताना एकमेकांमध्ये अंतर कमी ठेवले गेल्याने काही ढोलवादकांच्या डोक्यात टिपूर लागल्याने ५ ते ६ जण जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

वेगळा व्हिडिओ –

https://www.instagram.com/p/DAAh9N3JfGf

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed