Shivsena Shinde Group News | लोकसभेच्या पराभूत उमेदवारांना शिवसेना विधानसभेला उतरवण्याच्या तयारीत; शिंदे गटात जोरदार हालचाली

मुंबई : Shivsena Shinde Group News | लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थानिक मुद्द्यांवर लढून जिंकली, असा आरोप महायुतीकडून (Mahayuti) केला जातो. तसेच नॅरेटिव्ह पसरवून मतदारांना आकर्षित केल्याचेही बोलले जाते. संविधानाचा मुद्दा हा जनतेपर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचवल्याचाही आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांवर करण्यात आला.
दरम्यान आता खोट्या नॅरेटिव्हला बळी न पडता मुद्दे घेऊन जनतेत उतरण्याचे शिवसेना शिंदे गटाने ठरवलं आहे. लोकसभा निवडणूक नॅरेटिव्हमुळे हातून गेली. पण आता विधानसभेची गणिते वेगळी असल्याने चार महिन्यांपूर्वी पराभूत झालेल्या माजी खासदारांचे पुन्हा एकदा नशीब आजमावण्याचा विचार शिवसेना शिंदे गटाने गंभीरपणे घेतला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
राजकीय पक्ष लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांना विधानसभेच्या फडात उतरवायची तयारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी सुरू ठेवली असताना शिंदे गटात तसे स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे समजते. स्ट्राइक रेट वाढवण्याच्या प्रयत्नात या पराभूत उमेदवारांचा निवडणूक प्रवेश महत्त्वाचा मानला जातो आहे.
हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी नाशिक जिल्ह्यात तर मुंबईतून माजी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तयारी असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
बाबूराव पाटील यांनीही मतदारसंघाचालोकसभा निवडणूक नरेटिव्हमुळे हातून गेली शोध घेऊन तेथे नशीब आजमावण्याचा विचार शिंदे गटात सुरू आहे.
लोकसभेत लढण्याची संधी न मिळाल्याने कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन विधान परिषदेवर नियुक्त केले.
पण त्या दोघांनीही विधानसभेत निवडून यावे, अशी पक्षाची अपेक्षा असल्याचे समजते.
ते दोघे निवडून आल्यास त्यांच्या रिक्त जागांवर नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना नेमता येईल, असा अंदाज आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा