Amit Thackeray Contest Vidhan Sabha | अमित ठाकरे विधानसभा लढण्यास इच्छुक; तीन मतदारसंघात चाचपणी सुरु

Amit Raj Thackeray

मुंबई : Amit Thackeray Contest Vidhan Sabha | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) लढविण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या आढावा बैठकीत अमित ठाकरे यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकीसाठी मुंबईतील ३६ जागांचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.

मनसेची आढावा बैठक सोमवारी राजगडावर आयेजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), शिरीष सावंत (Shirish Sawant), संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), अमित ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज ठाकरे यांनी मुंबईतील ३६ जागांचा आढावा घेताना या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची माहिती घेतली आहे. लवकरच मुंबईतील ३६ जागांबाबत एक सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.

या आढावा बैठकीत अमित ठाकरे यांनीच आपण विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलून दाखवले.
मुंबईतील तीन जागांची अमित ठाकरेंसाठी चाचपणी केली जात आहे. यामध्ये माहीम (Mahim Assembly),
भांडुप (Bhandup Assembly) आणि मागाठणे (Magathane Assembly) या मतदारसंघांचा समावेश आहे.
त्यामुळे आगामी विधानसभेला अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून लढणार याबाबत उत्सुकता आहे. (Amit Thackeray Contest Vidhan Sabha)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed