Bapusaheb Pathare Join Sharad Pawar NCP | माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश; पुण्यात भाजपला मोठा धक्का

Bapusaheb Pathare

पुणे : Bapusaheb Pathare Join Sharad Pawar NCP | पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह महादेव पठारे (Mahadev Pathare), महेंद्र पठारे (Mahendra Pathare), भय्यासाहेब जाधव (Bhaiyasaheb Jadhav) आणि तीन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak Mumbai) निवासस्थानी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे पुण्यात शरद पवार गटाची ताकद वाढली आहे.

अजित पवार गटामुळे गणित चुकलं

बापूसाहेब पठारे २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून (Vadgaon Sheri Assembly) निवडून आले होते. २०१४ मध्ये भाजपाच्या जगदिश मुळीक (Jagdish Mulik) यांनी पठारेंचा पराभव केला. निवडणुकीच्या कालावधीत झालेल्या गटबाजीमुळे पठारेंनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. ते भाजपमध्ये गेले. २०१९ मध्ये त्यांना संधी मिळेल, पक्षाकडून त्यांना तिकीट दिलं जाईल अशी चर्चा होती. पण भाजपनं मुळीक यांनाच पुन्हा संधी दिली. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील टिंगरेंनी (Sunil Tingre) पराभव केला.

आता लोकसभा निवडणुकीतील राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दिलेला कौल पाहता पठारेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. २०१९ मध्ये पठारेंना भाजपनं विधानसभेचं तिकीट दिलं नाही. २०२४ मध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल, असं त्यांना वाटत होतं. पण अजित पवार गटामुळे (Ajit Pawar NCP) त्यांचं गणित चुकलं. वडगावशेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे वडगावशेरीची जागा महायुतीत अजित पवार गटाला जाण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पठारेंनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचं बोललं जातं. (Bapusaheb Pathare Join Sharad Pawar NCP)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed