Sharad Pawar | शरद पवारांच्या चमत्काराने भाजपचं टेन्शन वाढलं; राज्यात हरियाणा पॅटर्नचा भाजपला धसका

मुंबई : Sharad Pawar | आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) तयारी सुरु केलेली आहे. लोकसभेला जो फटका बसला तो विधानसभेला टाळण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. महायुतीत (Mahayuti Seat Sharing Formula) विधानसभेसाठी जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे.
एकीकडे मित्रपक्षांच्या मागण्या सुरु असताना दुसरीकडे आपल्याच नेत्यांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे. २०१४ मध्ये भाजपनं १२२ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये भाजपच्या जागा १०५ वर आल्या. यंदा भाजपचा आकडा १०० च्या आत येण्याची शक्यता आहे.
भाजपच्या आमदारांबद्दल असलेल्या अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा निकाली काढायचा, याची चिंता भाजपला सतावू लागली आहे. विद्यमान आमदारांची तिकिटं कापल्यास त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती भाजपला आहे. तिकिटं कापण्यात आलेले आमदार महाविकास आघाडीकडे गेल्यास काय, अशी चिंता भाजपला सतावत आहे.
हरियाणात भाजपने अनेक विद्यमान आमदार आणि मंत्र्यांची तिकिटं कापली. त्याचा फटका भाजपला बसला. अनेकांनी पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर काहीजण अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी भाजपकडून दक्षता घेतली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांकडे बऱ्याच मतदारसंघात उमेदवार नव्हते. बारामती, शिरुर, साताऱ्याचा अपवाद वगळता अन्य सगळ्याच जागांवर शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांमधील नाराजांना, इच्छुकांना गळाला लावलं आणि १० पैकी ८ जागा जिंकून आणल्या.
पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्याकडे वळवत माढ्यात बाजी मारली.
याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळेच आमदारांची नाराजी टाळण्यासाठी भाजप विशेष प्रयत्न करणार आहे.
अजित पवार महायुतीत सहभागी झाल्याने भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.
कागलमध्ये समरजीतसिंह घाटगेंनी कमळ सोडून हाती तुतारी घेतली आहे.
तर इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भरणेंना टक्कर देणारे भाजपचे हर्षवर्धन पाटीलदेखील नाराज आहेत.
ते तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या अनेक मतदारसंघात हीच स्थिती आहे.
त्यातच आता आमदारांनी तिकीट कापल्यावर भाजपची साथ सोडल्यास पक्षाच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा