Asian Champions Trophy 2024 | भारताने यजमान चीनला पराभूत करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

पुणेरा आवाज – Asian Champions Trophy 2024 | भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ च्या अंतिम फेरीत यजमान चीनला पराभूत केले आणि ट्रॅफी जिंकली. भारताने या स्पर्धेत एकही सामना गमवाला नाही. सामन्याच्या ५० मिनिटांमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नव्हता. पण त्यानंतर भारताला ५१ व्या मिनिटाला गोल करण्यात यश आले आणि या गोलच्या जोरावर त्यांनी जेतेपद पटकावले. भारताने ही फायनल १-० अशा फरकाने जिंकली.
पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांचा एक ही गोल नाही
भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित होता. त्यामुळे त्यांच्याकडून चाहत्यांना मोठ्या आशा होत्या. भारताने सामना सुरु झाल्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. पण भारताला जास्त आक्रमण करता आले नाही. कारण चीनच्या संघानेही आक्रमक पवित्रा घेतला होता आणि सामान चांगलाच रंगात आला होता. दोन्ही संघ आक्रमक खेळ खेळत होते. चीनने पाचव्या मिनिटाला भारताच्या हातून चेंडू आपल्याकडे घेतला. त्यानंतर चीनने काही काळ आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने यावेळी बचावावर अधिक लक्ष दिले. अमित रोहिदास जुगराज यांनी यावेळी चांगला बचाव केला आणि चेंडूवर ताबा मिळवला. त्यानंतर भारताला १० व्या मिनिटाला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. पण भारताला त्याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.
दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा चीनने घेतला होता. त्यावेळी भारतीय संघ सुरुवातीला बचाव करत होता. पण त्यानंतर आपल्या ताब्यात चेंडू आल्यावर त्यांनीही आक्रमण करायला सुरुवात केली. दोन्ही संघांना यावेळी गोल करण्याचा संधी आल्या होत्या. पण दोन्ही संघांना यावेळी गोल करता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या सत्रातही या सामन्यात एकही गोल झाला नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत हा सामना गोलरहीत होता.
सामना संपायला 10 मिनिटं बाकी आणि भारताचा गोल
मध्यंतरानंतर तिसऱ्या सत्रात चीनने चांगली सुरुवात केली. बराच काळ त्यांनी चेंडू आपल्या ताब्यात ठेवला होता. पण भारताचा बचाव अभेद्य असल्यामुळे त्यांना गोल करता आला नाही. पण या सत्राच्या सुरुवातीला त्यांनीच सामन्यावर वर्चस्व ठेवलेले होते. त्यामुळे भारत आक्रमण करण्याची संधी यावेळी शोधत होता. पण चीनने यावेळी जोरदार आक्रमण लगावले आणि भारताला जास्त संधी दिली नाही. तयामुळे आता चौथ्या सत्रात भारत कोणती कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
चीनने या सामन्यात जोरदार आक्रमण केले, त्यामुळे भारताला तीन सत्रांत गोल करण्याची संधी
मिळाली नव्हती. पण सामना संपायला १० मिनिटं शिल्लक असताना भारताेन गोल केला आणि त्यांनी दमदार आघाडी घेतली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा