Gang Rape In Hadapsar Pune | पुणे : बारामतीमधील १५ वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलींवर हडपसरमध्ये सामुहिक बलात्कार ! मित्रांनीच दारु पाजून केला अत्याचार

पुणे : Gang Rape In Hadapsar Pune | घरी काहीही न सांगता बारामतीहून पुण्यात आलेल्या दोघा अल्पवयीन मुलींवर चौघा जणांनी हडपसर येथील एका खोलीत दारू पाजून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
https://www.instagram.com/p/DAFu_H9NrAI
याप्रकरणी बारामती पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ज्ञानेश्वर भरत आटोळे Dnyaneshwar Bharat Atole (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे Aniket Pramod Bengare (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती), यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे Yash Alias Sonya Shivaji Atole (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
https://www.instagram.com/p/DAFfFJgCyIJ
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथील १५ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुली १४ सप्टेबर रोजी घरी काहीही न सांगता पुण्यात आल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या दोन तक्रारी बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police Station) दाखल झाल्या होत्या. या दोन्ही शहरातील वेगवेगळया शाळेत शिक्षण घेत आहेत. त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. पुण्यात एसटीने येताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने या दोघींना हडपसर येथील एका खोलीवर बोलावले. त्याने आपल्या दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुलींपाठोपाठ तो आणखी एका मित्राला घेऊन बारामतीवरुन हडपसरला (Baramati To Hadapsar) आला. तेथे एका मित्राच्या खोलीवर त्याने या मुलींना नेले. रात्री त्यांनी या दोघींना दारु पाजली. त्यानंतर चौघांनी त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर त्या मुली हडपसरला बसस्टॉपवर आल्या. तेथील एका प्रवाशाच्या मोबाईल वरुन एकीने आपल्या आईला फोन केला. बारामती तालुका पोलिसांना आईने मुली हडपसरला असल्याची माहिती दिली. त्यांनी हडपसर पोलिसांना ही माहिती देऊन मुलींना ताब्यात घेतले.
https://www.instagram.com/p/DAD3BxzJwAD
बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी दोघींना बारामती पोलीस ठाण्यात आणले. त्यांना महिला पोलिसांनी समुपदेशन केले. यावेळी या मुलींनी आपल्याला दारु पाजून आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर आटोळे याला अटक केली. त्याच्याकडून इतरांची नावे निष्पन्न झाल्यावर आणखी दोघांना अटक केली. चौथ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/DAFjxRCJoyk
या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यात अॅट्रोसिटी (Atrocity Act), लैगिक शोषण (Sexual Exploitation) तर दुसरा लैगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/DADq4pVizoC
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा