Sharad Pawar On Ajit Pawar | पक्षातील बंड आणि अजित पवारांच्या निर्णयावर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले, “अजित पवार यांनी साथ सोडल्यानं अस्वस्थता वाटली, पण… “

मुंबई: Sharad Pawar On Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार काही आमदार सोबत घेत महायुतीत (Mahayuti) सहभागी झाले. त्याठिकाणी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा महाराष्ट्रभर दौरा करत उर्वरित नेते, पदाधिकारी यांना जोडून घेत त्यांना विश्वास आणि बळ दिलं. (Sharad Pawar On Ajit Pawar)
त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १० पैकी ८ खासदार निवडून आले. तसेच आता विधानसभेला अनेकांना तुतारी या चिन्हावर लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे बंड झाल्यावर काहीशे शांत झालेले पवार आता आगामी विधानसभेला राज्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी पक्षातील बंड आणि अजित पवारांच्या निर्णयावर आपली भूमिका मांडली आहे. शरद पवार म्हणाले, “अजित पवार यांनी साथ सोडल्यानं धक्का बसला नाही पण अस्वस्थता वाटली. अजित पवार एकटेच नाही तर त्यांच्यासोबत विधिमंडळातील २५-३० सभासद गेले. अनेकांच्या निवडणुकीच्या यशासाठी तिथं गेलो असेन, त्यांच्यासाठी भाषणं केली असतील. गेल्या पाच दहा वर्षात त्यांना ग्रुम केलं असेल, अजित पवार त्याच्यातील एक घटक “,असं शरद पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ” हे लोक सोडून जातात, विधिमंडळात ज्यांच्या विरुद्ध ते निवडून आले. ज्या भूमिकेला त्यांनी विरोध केला, तिच भूमिका घेऊन ज्यांच्याविरुद्ध लढले त्यांच्याच दारात बसले, त्यामुळं अस्वस्थता वाटते. लोकांना जी कमिटमेंट केलेली आहे, त्याच्याशी सुसंगत पावलं टाकली जात नाहीत, त्यामुळं अस्वस्थता असते”, असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा