Jayant Patil On Third Front Maharashtra | तिसऱ्या आघाडीच्या चर्चेवर जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले – “भाजपला अप्रत्यक्ष मदत…”
मुंबई: Jayant Patil On Third Front Maharashtra | आगामी विधानसभेला (Maharashtra Assembly Election 2024) काही कालावधी उरला असताना आता राज्यात महायुती आणि महविकास आघाडीला (Mahayuti Vs Mahvikas Aghadi) टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीबाबत रणनीती ठरवली जात आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu), स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati), भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन नवीन आघाडीबाबत चर्चा सुरु केलेली आहे.
सत्तेचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे. सत्तेला अनेक पर्याय उभे राहिले पाहिजे. दावेदारी वाढली, पक्ष वाढले तर काम करणाऱ्यांना अधिक काम करावे लागते. कामाशिवाय पर्याय नाही, आमची तिसरी आघाडी नव्हे तर महाशक्ती असेल,असे म्हणत बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीबाबत भाष्य केले. याबाबत पुण्यात नेत्यांची बैठक पार पडत आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बच्चू कडू यांना महाविकास आघाडीत येण्याचे आवाहन केले आहे.
माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ” बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या विरोधात महाराष्ट्रात एक आघाडी तयार केली आहे. पण आमच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत, त्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाहीत, असा मला विश्वास आहे “, असे त्यांनी म्हंटले.
ते पुढे म्हणाले, “बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी हे आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही
त्यांचे स्वागतच करू. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही, याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. सत्ताधारी पक्षातून काही लोक आमच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे”, असे भाष्यही जयंत पाटील यांनी केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा