Pune News | पुण्यात महंमद पैगंबर जयंती साजरी होणार डीजे मुक्त

Seerat Committee Pune

पुणे : Pune News | प्रेषित महंमद पैगंबर जयंती दिनांक १६ सप्टेंबर रोजी आणि 17 तारखेला गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने प्रेषित महंमद पैगंबर जयंती (Mohammad Paigambar Jayanti) निमित्त काढली जाणारी मिरवणूक 21 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय सिरत कमिटीने (Seerat Committee Pune) घेतला आहे. यंदाची प्रेषित महंमद पैगंबर जयंतीची मिरवणूक ही DJ मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. दरम्यान पुणे पोलीस आयुक्त, सहआयुक्त व पोलीस प्रशासन सीरत कमिटी व सामाजिक संघटनांची संयुक्त बैठकीत घेण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी

https://www.instagram.com/p/DAGFVuSiahF

डीजे मुक्त पैगंबर जयंती साजरी करण्याच्या निर्णयाचा पुणे पोलिसांनी कौतुक केले आहे. सिरत कमिटीने घेतलेला डीजे मुक्त पैगंबर जयंती हा निर्णय अत्यंत सामाजिक सौहार्द, जातीय सलोखा निर्माण करणारा व दोन समाजामध्ये बंधू भाईचारा वाढविणारा असून पुणे पोलीस तुमच्या या कार्याचा स्वागत व गौरव करीत आहे. पुणे पोलीस सहआयुक्त माननीय रंजन कुमार शर्मा यांना सिरत कमिटीच्या वतीने विनंती करण्यात आली होती ती डीजे वाजविणे, ढोल ताशे, गाणे व लेझर लाइटिंग असा सर्व चुकीचा प्रथेला इस्लाम धर्माने स्पष्टपणे नाकार दिलेला आहे. त्याबाबत इस्लाम धर्माचा कोणताही पंत असो त्या पंथा नुसार अशा पद्धतीचा गैर कृत्य करणे किंवा डीजे लावून पैगंबर जयंती साजरी करणे इस्लामला मान्य नाही, त्याबाबत सिरत कमिटीच्या सर्व वरिष्ठांनी इस्लाम धर्माच्या अभ्यासक,सखोल माहिती असणाऱ्या धर्मगुरू यांनी एक मुखांनी निर्णय घेतला आहे. 200 पेक्षा जास्त मशिदीतील धर्मगुरूंनी य सीरत कमिटीच्या निर्णयाला पाठिंबा दिला व त्यांनी अहवान केले की आमच्या भागात असलेल्या स्थानिक मंडळांनाही आम्ही आवाहन केले आहे, यावर्षी डीजे न वाजवता पारंपारिक पद्धतीने व शांती पूर्वक मुस्लिमांनी प्रेषित महंमद पैगंबर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन केले आहे.

https://www.instagram.com/p/DAFxEh9p-HA

पुणे शहरातील सिरत कमिटीच्या डीजे मुक्त प्रेषित पैगंबर जयंतीची मिरवणुकीचा पुणे शहरातील 200 मुस्लिम धर्मगुरूंनी पाठिंबा दिला व तसेच पैगंबर यांच्या जयंतीत सामील होणाऱ्या जवळपास 137 संघटनांना आवाहन केले आहे.

https://www.instagram.com/p/DAEK4cUidK4

यंदाची मिरवणूक डीजे मुक्त करून आपण संपूर्ण देशाला एक आदर्श मुस्लिम समाज असल्याचा संदेश देण्याचा आमचा मानस आहे यंदाची मिरवणूक प्रेषित महंमद पैगंबर यांची डीजे मुक्त या अभियानाला पुणे पोलिसांनी पूर्णपणे साथ दिली आहे. काही लोकांनी खोडसळपणांनी अर्ज केला असला तरी पुणे पोलिसांनी त्यांना कोणताही साद न देता सांगितले की ज्या अर्थी समस्त मुस्लिम पुण्यातील बांधवांनी डीजे मुक्त पैगंबर जयंती करण्याचे ठरविले असल्याने आपण तरुणांनी जिद्द करू नये. डीजेला परवानगी न देण्याचा यंदा आम्ही पोलिसांनी ही निर्णय घेतला आहे. ज्या अर्थी समस्त मुस्लिम समाज व धर्मगुरूच्या विरोध असताना कोणताही परवानगी आम्ही कोणत्याही मंडळाला देणार नाही असा स्पष्ट इशारा पुणे पोलिसांनी काही ठराविक संघटनांना दिले आहे.

https://www.instagram.com/p/DAEFm2xiYSq

डीजे मुक्त पैगंबर जयंती सालाबाद प्रमाणे सकाळी 8 वाजता मनुशाह मस्जिद येथून सुरू होऊन नियमित मार्ग प्रमाणे म्हणजेच एडी कॅम्प चौक, निशांत थेटर, भगवानदास चाळ, मुक्तीफौज चौक, शिवाजी मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, कुरेशी मज्जिद एमजी रोड, महावीर चौक, साचापीर स्ट्रीट, क्वार्टर गेट चौक, लक्ष्मी रोड, संत कबीर चौक मार्गे गणेश पेठ हमजे खान चौक. तेथून डावीकडे रांका ज्वेलर्स ते उजव्या हाताला असलेल्या बागवान मशीद, सुभान शहा दर्गा चौक, जामा मशीद येथे दुपारी असलेल्या जोहरची नमाजच्या वेळी सिरत कमिटी पुणे शहर अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद खान कादरी व सिरत कमिटीच्या सर्व सदस्य व मुस्लिम धर्मगुरू यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली साधारण दोन वाजता मिरवणुकीचे समारोप होईल.

https://www.instagram.com/p/DAEA2w9CkCu

आजम कॅम्पस या ठिकाणी आज तारीख 19 सप्टेंबर 2024 रोजी सीरत कमिटी सोबत दोनशे मुस्लिम धर्मगुरू, मशिदीचे ट्रस्टी व सामाजिक संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत एका मताने निर्णय घेण्यात आले की या वर्षी आपण सर्वांनी डीजे मुक्त पैगंबर जयंती साजरी करून मुस्लिम समाजाने देशाला आदर्श समाज असल्याचे दाखवावे सर्व मुस्लिम धर्मगुरूंनी शुक्रवारच्या नमाजच्या वेळी प्रत्येक मशिदीत तरुणांनी डीजे मुक्त व शतातेत पैगंबर जयंती साजरी करावी असे प्रबोधन ही करावे असेही आव्हान धर्मगुरूंना केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला