Shivsena Thackeray Group | शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे प्रस्ताव; बदल्यात कमी जागांवर लढण्याची तयारी?

Mahavikas Aghadi

मुंबई: Shivsena Thackeray Group | महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री पदाचा चेहरा (Face Of CM Of MVA) कोण यावरून अनेकदा चर्चा झाल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव चर्चेत होते मात्र निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री ठरवला जाईल या राष्ट्रवादी (Sharad Pawar NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) भूमिकेनंतर या चर्चा काहीशा थांबल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता पुन्हा ठाकरे गट मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झाला असून मुख्यमंत्रीपदासाठी नवा प्रस्ताव काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर ठेवल्याची माहिती आहे. (Shivsena Thackeray Group)

या प्रस्तावानुसार ठाकरे गटाकडून कमी जागांवर लढण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवली आहे. मात्र मुख्यमंत्रीपद ठाकरे गटाला देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसपेक्षा १० जागा कमी लढण्याची तयारी ठाकरे गटाकडून दाखवण्यात आली आहे.

२०१९ ला युतीमध्ये १२५ जागांवर शिवसेना लढली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून ९५ जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेसची ११५ जागांची मागणी आहे. मात्र, त्यांनी १०५ जागा आणि शरद पवार गटाने ८८ जागा लढाव्यात, असा देखील प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेसाठी बैठका होत आहेत.
या बैठकीमध्ये ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील काही जागांवरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याची देखील माहिती आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Aarpaar Marathi | ‘आरपार’तर्फे प्रसारित केलेल्या पुनीत बालन प्रस्तुत ‘बाप्पा मोरया रे’ विसर्जन मिरवणुकीच्या ‘थेट प्रक्षेपणाला’ भरघोस प्रतिसाद!

IPS Shivdeep Lande Resigns | बिहारचे सिंघम मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडेंचा तडकाफडकी राजीनामा; कारण अस्पष्ट

BJP Strategy For MH Election 2024 | भाजपच्या 50 उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त ठरला; विधानसभेच्या 160 जागा लढण्याच्या तयारीत

You may have missed