Ajit Pawar To MLA Sanjay Gaikwad | वादग्रस्त विधानावरून मुख्यमंत्र्यांसमोरच शिंदे गटाच्या आमदाराला अजित पवारांनी सुनावले खडेबोल; म्हणाले – ” वाचाळविरांनी आपापल्या मर्यादा… “

बुलढाणा: Ajit Pawar To MLA Sanjay Gaikwad | आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर असताना महायुतीच्या नेत्यांकडून (Mahayuti Leaders) वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहे. याबाबत आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांसमोर (Eknath Shinde) खडेबोल सुनावत त्यांचे कान टोचले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम बुलढाण्यात आज (दि.१९) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड यांचीही उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले, ” मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन. प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. पण, कुठलाही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, वाचाळविरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात.
आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतो. कुठेही वेडेवाकडे विधान करून कुठेही मुख्यमंत्र्यांना,
महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नका. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो.
पण, राग व्यक्त करताना काही मर्यादा असतात. त्यासंदर्भात कुठली भाषा वापरली जाते?”,
अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांसमोर संजय गायकवाड यांना फटकारले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा