Maharashtra Politics | विधानसभेला अजित पवारांचं मुस्लिम कार्ड भाजपला रुचणार? राष्ट्रवादीकडून प्रत्येक प्रादेशिक विभागात मुस्लिम उमेदवार

पुणे: Maharashtra Politics | राज्यातील विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पण राजकीय नेत्यांनी याबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics )
विधानसभेसाठी भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे (Shivsena Shinde Group) गटाकडून हिंदुत्ववादी सुर पकडण्यात आला आहे. भाजप नेत्यांकडून त्यापद्धतीने वक्तव्ये केली जात आहेत. मात्र महायुतीला (Mahayuti) घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने (Ajit Pawar NCP) आपल्या कोट्यातील १० टक्के जागांवर मुस्लिम उमेदवार (Muslim Candidate) देण्याचे ठरवले आहे. पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीच्या जागावाटपात (Mahayuti Seat Sharing Formula) मुंबईतील ३६ जागांपैकी चार जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे.
या चारही जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुस्लिम उमेदवार देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्याशिवाय प्रत्येक प्रादेशिक विभागात एक मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक, सना मलिक, जिशान सिद्दीकी आणि नजीम मुल्ला यांची संभाव्य उमेदवार म्ह्णून चर्चा आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!