Supreme Courts YouTube Channel Hacked | सर्वोच्च न्यायालयाचे यूटयूब चॅनल हॅक ! न्यायालयाच्या तंत्रज्ञान विभागाने दिली माहिती

पुणेरा आवाज – Supreme Courts YouTube Channel Hacked | अज्ञात व्यक्तीकडून सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत न्यायालयाच्या तंत्रज्ञान विभागाच्या रजिस्टारकडून माहिती देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने अकाउंट सुरू करून अज्ञात व्यक्तीने सरन्यायाधीश असल्याचे भासवून 500 रूपये मागितले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा ही दाखल केला होता.
आता सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाल्याची घटना घडली आहे. या चॅनलवर सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठासमोर खटल्यांची सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण केले जाते. याशिवाय त्यावर सुनावणीचे व्हिडीओ ही अपलोड केले जातात. सन 2018 मध्ये न्यायालयाने सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनतर पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. अज्ञात व्यक्तीकडून हे चॅनल हॅक करण्यात आले आहे. सुनावणीचे व्हिडीओ गायब करण्यात आले असून त्यावर एका क्रिप्टोकरन्सीची जाहिरात दिसत आहे. हा प्रकार उघडकीस येताच न्यायालयाच्या तंत्रज्ञान विभागाच्या रजिस्टारकडून याबाबत माहिती देण्यात आली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!