Rasta Roko Andolan For Dhangar Reservation | धनगर आरक्षणावरून 23 तारखेला राज्यभर रास्ता रोको; गोपीचंद पडळकरांचे आवाहन, म्हणाले – “मी सरकारमध्ये असलो तरी….”

मुंबई : Rasta Roko Andolan For Dhangar Reservation | धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी २३ तारखेला राज्यभर रास्ता रोको (Rasta Roko For Dhangar Reservation) करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यासाठी सरकारने (Mahayuti Govt) पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
https://www.instagram.com/p/DAI0dkHp_by
धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यासाठी धनगर आणि धनगड (Dhangad) या जाती एकच असल्याचा शासन आदेश काढण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे. एकीकडे धनगर समाजाला अनुसूचित जातीतून आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे एसटी समाजातील नेत्यांनी याला विरोध केला आहे. हा निर्णय झाल्यास काही आमदारांनी राजीनामा देणार असल्याचेही म्हंटले आहे.
https://www.instagram.com/p/DAIjMyepXCj
यावरूनच आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी रास्ता रोको करणार असल्याचे म्हंटले आहे. यासाठी सर्वानी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे.
https://www.instagram.com/p/DAIu20AJUW8
गोपीचंद पडळकर म्हणाले, “मी सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारच्या विरोधात आंदोलन का करतोय तर मी आधी समाजाचा आहे. सरकार सगळ्या बाबतीत सकारात्मक आहे, मी तशा प्रकारची कागदपत्रे सुद्धा सरकारकडे दिली आहेत. आदिवासी नेते आणि काहीजण मुद्दामून सरकारवर जीआर निघू नये यासाठी दबाव टाकत आहेत. आम्ही आदिवासी नेत्यांना विनंती करतो की आमच्या सोबत आणि सरकार सोबत चर्चा करा”, असे पडळकर यांनी म्हंटले.
https://www.instagram.com/p/DAIpljEC0l-
ते पुढे म्हणाले, “आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. हे आम्ही लिहून दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत, त्यानुसार एसटीमध्ये वर्ग करून आम्हाला आमचं आरक्षण मिळणार आहे. आदिवासी नेते जर म्हणत असतील आम्ही पाणी कट करू, रूळ उखडून टाकू तर आम्ही सुद्धा मागे राहणार नाहीत.
https://www.instagram.com/p/DAIlDwKpum4
आम्ही येत्या सोमवारी २३ तारखेला सकाळी ११ वाजता राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. मी सर्व धनगर बांधवांना आवाहन करतो की तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हावं”, असं पडळकर यांनी आवाहन केलं आहे. (Rasta Roko Andolan For Dhangar Reservation)
https://www.instagram.com/p/DAIVYxOtGGa
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!