Laxmi Road Pune Crime News | विसर्जन मिरवणुकीत अश्लिल हावभाव करणार्‍यास जाब विचारल्याने टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण

marhan

पुणे : Laxmi Road Pune Crime News | एरंडवणे येथील अखिल गणेश मंडळाच्या (Akhil Ganesh Mandal Erandwane) विसर्जन मिरवणुकीत ट्रक्टरवर उभा राहून अश्लिल हावभाव करणार्‍याला जाब विचारल्याच्या रागातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण (Bedum Marhan) करण्याचा प्रकार समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/DAI0dkHp_by

याप्रकरणी शिवम प्रसाद मारणे (वय २४, रा. गणेशनगर, एरंडवणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओमकार वेडे, श्रीकांत कदम, आकाश मापारी, शुभम चोरगे (रा. गणेशनगर, एरंडवणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार विसर्जन मिरवणुकीत १८ सप्टेबर रोजी सकाळी ११ वाजता लक्ष्मी रोडवरील कजरी चौकात (Kajree Chowk Laxmi Road Pune) घडला.

https://www.instagram.com/p/DAIjMyepXCj

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणा येथील अखिल गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणुक लक्ष्मी रोडवरील कजरी चौकात आली होती. त्यावेळी ओमकार वेडे हा ट्रक्टरवर उभा राहून फिर्यादी यांच्याकडे पाहून घाणेरडे इशारे करु लागला. फिर्यादी यांनी असे घाणेरडे इशारे का करत आहे, असा जाब विचारला. त्यावर त्याचे मित्र आकाश, श्रीकांत, शुभम यांनी वाद घालून फिर्यादी व फिर्यादीचा चुलत भाऊ तन्मय यांना मारहाण केली. आकाश मापारी यांने फिर्यादी यांना मागे ओढत घेऊन गेला. त्यांच्याकडील लोखंडी वस्तूने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. ओमकार वेडे हा सुद्धा खाली उतरुन त्याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस हवालदार माने तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAIu20AJUW8

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | सराईत वाहनचोराकडून ६ मोटारसायकली हस्तगत ! भोसरी, चाकण, चिंचवड, शिर्डी, सोलापूर येथे केल्या होत्या चोर्‍या (Video)

Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!

MCOCA Action On Enjoy Group | जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर मोक्का कारवाई (Video)

You may have missed