City Post Office Pune News | पुण्यात रस्ता खचला अन् ट्रक थेट खड्ड्यात गेला; कोणतीही जीवितहानी नाही; प्रशासनाचा गलथान कारभार समोर (Videos)

पुणे: City Post Office Pune News | प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या समाधान चौकात एक अख्खा ट्रक खड्ड्यामध्ये गेल्याची घटना घडली आहे. रस्ता खचला आणि ट्रक थेट २५ फूट खड्ड्यात गेला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलबाग चौकाजवळ (Belbaug Chowk Pune) सिटी पोस्ट ऑफिस आहे. या ऑफिसच्या आवारामध्ये अचानक पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून संपूर्ण ट्रक थेट खड्ड्यामध्ये कोसळल्याची घटना समोर आली. पालिकेच्या मैलापाणी वाहिनीच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराचा ट्रक आणि कामगार हे पोस्ट ऑफिस परिसरातील चेंबरचे काम करत होते.
मात्र, त्यावेळी ट्रक उभा असलेला रस्ता खचला आणि ट्रकच्या केबिनचा भाग वगळता संपूर्ण ट्रक जमिनीत गाडला गेला. खड्ड्यात गेलेला हा ट्रक पुणे महापालिकेचा असून प्रसंगावधान ओळखून ड्रायव्हरने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. त्यानंतर त्याठिकाणी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. ट्रकसोबत दोन दुचाकी सुद्धा खड्ड्यात गेल्याची माहिती आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!