Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून ! सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)

Hadapsar Police

पुणे : Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने घरात वाद होत. त्याच्या रागातून तरुणावर वार करुन त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) सोलापूरहून (Solapur Crime) दोघांना ताब्यात घेऊन १२ तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. (Hadapsar Murder Case)

https://www.instagram.com/p/DAJM7t8pKwn

अमोल ऊर्फ भावड्या मारुती माने (वय ३९, रा. रामोशी आळी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी वैभव गणेश लबडे (वय ३१, रा. हिंगणे आळी, हडपसरगाव) आणि ज्ञानेश्वर दत्तु सकट (वय २७, रा. रामोशी आळी, हडपसर) यांना अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DAKn0jni3HB

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने हा केटरिंगचे काम करत होता. तो एकटाच रहात होता. त्याची बहिण संगीता कुलकर्णी ही त्याला फोन करत होती. परंतु तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे तिने त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला १९ सप्टेबर रोजी रात्री घरी पाठविले. तेव्हा त्या व्यक्तीला अमोल माने हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

https://www.instagram.com/p/DAKsk3Kiixv

पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV Footage) व मिळालेल्या माहितीच्या आधारे वैभव लबडे याला हडपसर भागातून तर ज्ञानेश्वर सकट याला सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर खूनामागचे कारण समोर आले. अमोल माने आणि वैभव लबडे हे एकमेकांचे मित्र होते. त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते. अमोल हा वैभवला असलेल्या व्यसनाविषयी वेळोवेळी त्याच्या आईला व पत्नीला सांगत असे. त्यामुळे वैभव याचे त्याच्या आई व पत्नीबरोबर वाद होत होते. अमोल हा वेळोवेळी त्याच्या नशेबद्दल सांगून आई व पत्नीला भडकवत असल्यामुळे वैभव याच्या मनात अमोलबाबत राग होता. या रागातूनच आरोपीने त्याचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे (PI Nilesh Jagdale) तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAJPd6jpVn9

वैभव लबडे हा टेम्पोचालक आहे. ज्ञानेश्वर सकट हा अमोल माने याच्या जवळ राहतो. वैभव व ज्ञानेश्वर यांनी लोखंडी रॉड अमोल याच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला. त्यानंतर ज्ञानेश्वर सकट हा पळून गेला होता. पोलिसांनी त्याला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे (Sr PI Santosh Pandhare) यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAJLHSpJakz

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे (API Arjun Kudale) , पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे (PSI Mahesh Kavle), पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दीपक कांबळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, निलेश किरवे, अमोल दणके, कुंडलिक, केसकर, तुकाराम झुंजार, अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे.

https://www.instagram.com/p/DAJBH5KJ4Or

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | सराईत वाहनचोराकडून ६ मोटारसायकली हस्तगत ! भोसरी, चाकण, चिंचवड, शिर्डी, सोलापूर येथे केल्या होत्या चोर्‍या (Video)

Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!

MCOCA Action On Enjoy Group | जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर मोक्का कारवाई (Video)