Maharashtra Assembly Election 2024 | ठरलं! महाविकास आघाडीत जागावाटपावरून एकमत; काँग्रेस 100 जागा लढणार, राष्ट्रवादी-शिवसेनेच्या वाट्याला किती? जाणून घ्या
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून जागावाटपावर (MVA Seat Sharing Formula) चर्चा सुरु आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे.
विधानसभेला घेऊन राजकीय हालचालींना वेग आला आहे. जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरु आहे. यातून आता जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Maharashtra Congress) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Thackeray Group) हे दोन पक्ष प्रत्येकी १०० जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Sharad Pawar NCP) वाट्याला ८४ तर इतर मित्रपक्षांना उर्वरित ४ जागा दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने आणि लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा विचार करून महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात होती.
दुसरीकडे, उद्धव ठाकरेंची शिवसेनाही जास्तीत जास्त लढण्यासाठी आग्रही होती. तर आम्ही लोकसभा निवडणुकीत कमी जागा घेऊन तडजोड केल्याने आता विधानसभा निवडणुकीत त्याची कसर भरून निघावी, अशी राष्ट्रवादी पक्षाची अपेक्षा होती. या सगळ्या बाबींमुळे मविआच्या जागावाटपाचे घोडे अडले होते. मात्र आता समोर आलेल्या नव्या फॉर्म्युल्यावर तीनही पक्षांचे एकमत झाले असल्याची माहिती आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्या गुन्हेगाराला अटक
Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)