Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP | शरद पवारांचा नवा डाव; हातातून घड्याळ जाणार? अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं
दिल्ली: Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला घवघवीत यश मिळाले. १० पैकी ८ खासदार निवडून आले. लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान तुतारी (Tutari) चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांकडे अनेक इच्छुकांची रांग लागली आहे. दुसरीकडे अजित पवारांना धक्का देण्यासाठी शरद पवारांनी नवा डाव टाकला आहे.
सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या याचिकेत शरद पवारांनी नवी मागणी केली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी (Maharashtra Assembly Election 2024) अजित पवार गटाला निवडणूक चिन्हे देण्यात यावं, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.
यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Singhvi) यांनी खंडपीठाकडे आहे. त्यांची ही मागणी मान्य झाली असून येत्या २५ सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. शरद पवार यांच्या या नव्या खेळीमुळे अजित पवार गटाचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे.
खंडपीठाने जर त्यांच्या याचिकेवर सकारात्मक निकाल दिला तर अजित पवार यांच्या हातातून घड्याळ चिन्ह जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील दोन वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेंशन करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नव्हती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे नवीन पक्षचिन्ह दिले होते.
इतकंच नाही तर आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’
हे नाव वापरण्याची त्यांना परवानगी दिली होती. यावर निवडणूक लढवत शरद पवार गटाने
मोठा विजय संपादित केला. दुसरीकडे घड्याळ चिन्ह हातात असूनही अजित पवार गटाला मोठा पराभव सहन करावा लागला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्या गुन्हेगाराला अटक
Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)