Mahayuti News | अजित पवार गटाच्या उमेदवाराविरोधात शिंदे गटाचा नेता रिंगणात उतरणार; महायुतीत अनेक मतदारसंघात संभ्रम; बंडखोरी रोखण्याचे आव्हान
हिंगोली: Mahayuti News | राष्ट्रवादीत बंड झाल्यावर अजित पवार काही आमदारांना सोबत घेत महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा फटका बसला. या निवडणुकीत अजित पवार गटाची (Ajit Pawar NCP) अवघी एक जागा निवडून आली.
त्यानंतर अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. संघानेही या मुद्यावरून जाहीर भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आता आगामी विधानसभेला (Maharashtra Assembly Election 2024) अजित पवार महायुतीत असतील का? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी अजित पवार महायुतीत राहतील हे स्पष्ट केले. तसेच मित्रपक्षांनी त्यांच्यावर टीका करू नये, अशा सूचनाही दिल्याची माहिती आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत एकापेक्षा अधिक उमेदवार असल्याने अनेक मतदारसंघात बंडखोरी निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार असताना अनेक मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्यासाठी दंड थोपटत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुतीत अनेक मतदारसंघात हा तिढा उपस्थित झाला आहे.
त्यातच वसमत विधानसभा मतदारसंघाचे (Basmath Assembly Constituency) नेतृत्व सध्या राजू नवघरे (Raju Navghare) यांच्याकडे आहे. ते महायुतीचे असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत. मात्र याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे राजू चापके (Raju Chapke) हे निवडणुकीसाठी तयारी करत आहे.
राजू चापके हे तालुकाप्रमुख म्हणून गेल्या ५ वर्षापासून हा मतदारसंघ बांधत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता. तू मतदारसंघात काम कर, ही जागा आपल्याला लढायची आहे, असे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार राजू चापके यांनी सांगितले.
राजू चापके यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, ” एकनाथ शिंदे यांच्या शब्दानंतर मी या मतदारसंघात तयारी करत आहे. शब्दाप्रमाणे ते नक्कीच हा मतदारसंघ मला लढवण्यासाठी संधी देतील. महायुतीचा घटक पक्ष म्हणून इथल्या विद्यमान आमदारांनी कधीही आम्हाला सोबत घेतले नाही. कधीही चर्चा केली नाही.
शिवसेना- भाजपाला कधी विश्वासात घेतले नाही. उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही बोलावले नाही. मुंबईला गेले की अजितदादा आणि मतदारसंघात आले की शरद पवार अशी त्यांची संभ्रमावस्था आहे”, असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “तसेच राष्ट्रवादीतील ही नुराकुस्ती आणि मॅनेज कार्यक्रम आहे. मतदारसंघातील जनतेला हा काय घोळ आहे हे माहिती आहे. महायुतीकडून चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांना जर उमेदवारी मिळाली तर ते चुकीचे ठरेल. ते कधीही मतदारसंघात महायुतीचे घटक म्हणून वावरलेच नाहीत. महायुतीच्या कार्यकर्त्यांना ते आपलेसे वाटले नाहीत. महायुतीचा मतदार कदापि त्यांच्यासोबत जाणार नाही.
महायुतीच्या सर्व्हेतही ते तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर असतील. जर तरीही महायुतीने त्यांना उमेदवारी दिली, तर ज्याचा पराभव अटळ आहे त्याला तिकीट देऊन महायुतीचे नुकसान करू नये अशी मी विनंती करतो. राजू नवघरे यांचे काम करणं आमच्याकडून शक्य नाही. आपल्या कार्यकर्त्यावर जो अन्याय होतोय, या गोष्टीला थारा देणं बंद करावे. शिवसेनेसारखीच भाजपा कार्यकर्त्यांची अवस्था आहे “,असा आरोप राजू चापके यांनी केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्या गुन्हेगाराला अटक
Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)