Hadapsar Pune Crime News | 52 पार्सलपैकी केवळ 10 पार्सल डिलिव्हरी बॉयने पोहचविल्या ! कॅश ऑन डिलिव्हरीसह अन्य पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय पसार

Fedex-Courier-Scam

पुणे : Hadapsar Pune Crime News | प्लिपकार्ट कंपनीच्या ग्राहकांना डिलिव्हरी (Flipkart Online Shopping) देण्यासाठी दिलेल्या ५२ पार्सलपैकी केवळ १० पार्सल ग्राहकांना पोहचविल्या. उर्वरित पार्सलचा अपहार करुन डिलिव्हरी बॉय पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/DAKn0jni3HB

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) विशाल बापू पाटील Vishal Bapu Patil (वय २६, रा. हडपसर, मुळ गाव सिंधखेडा, धुळे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्लिपकार्ट कंपनीचे एरिया मॅनेजर मंगेश ससाणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी घडली होती.

https://www.instagram.com/p/DAKsk3Kiixv

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लिपकार्ट कंपनीचे फुरसुंगीतील आय बी एम कंपनीजवळ गोदाम आहे. कंपनीच्या अ‍ॅपद्वारे ग्राहक त्यांना हव्या असणार्‍या वस्तू ऑनलाईन पद्धतीने खरेदी करत असतात. या खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहच करण्याचे काम या गोदामातून होत असते. येथे एकूण ६० डिलिव्हरी बॉय काम करतात. त्यापैकी विशाल बापू पाटील याला १४ ऑगस्ट रोजी गाडीतळ परिसरातील एकूण ५२ पार्सल पोहच करण्याचे काम दिले होते. परंतु, गोदाम बंद करण्याची वेळी झाली तरी रात्री बारा वाजेपर्यंत विशाल पाटील परत आला नाही. त्याने रिपोर्ट जमा केला नाही. नंतर तो रिपोर्ट करेल, याची फिर्यादी वाट पहात होते. त्याचा मोबाईलही बंद असल्याने त्यांनी त्याला दिलेल्या पार्सलबाबत चौकशी केली.

https://www.instagram.com/p/DAKvEUAijmD

या ५२ पार्सलपैकी ३२ पार्सल या कॅश ऑन डिलिव्हरी स्वरुपाच्या होत्या.
त्याचे एकूण १६ हजार ७९४ रुपये विशाल पाटील याने ग्राहकांकडून घेतले. परंतु, ते गोदामात जमा केले नाही. उर्वरीत ६५ हजार ४८३ रुपयांचे १० प्रिपेड पार्सलमधील वस्तू स्वत:साठी वापरल्या. दिलेल्या ५२ पार्सलपैकी फक्त १० पार्सल नेहमीप्रमाणे ग्राहकांना दिले. अशा प्रकारे त्याने ८२ हजार २७७ रुपयांचा अपहार केला. पोलीस अंमलदार ननवरे तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAK2wopCaHq

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्‍या गुन्हेगाराला अटक

Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)

You may have missed