Sharad Pawar On Nana Patole | नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – “त्यामध्ये काही चुकीचं नाही…”

चिपळूण: Sharad Pawar On Nana Patole | महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? यावरून विविध चर्चा सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून तयारी सुरु आहे. दरम्यान शरद पवार चिपळूण दौऱ्यावर आहेत. (MVA Face Of CM)
दरम्यान माध्यमांशी संवाद साधत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करीत आहेत असे पवारांना विचारले असता त्यांनी एका वाक्यात विषय संपवत ” कार्यकर्ते जर मागणी करीत असतील तर यात काहीच चुकीचं नाही “, असे म्हंटले.
शरद पवार म्हणाले, ” कुठल्याही पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला नेता राज्यकर्ता व्हावा असे वाटत असेल तर यामध्ये काहीच चुकीचं नाही.” नागपूर शहरातील काँग्रेसच्या सर्व ६ जागांवरील दाव्याबाबत पवार म्हणाले, “जर ते सहाच्या सहा जागा लढवणार असे म्हणत असतील तर त्यावर मला आता काहीही बोलायचे नाही.”, असे पवार यांनी म्हंटले.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? यावर पवार म्हणाले, “आमच्या दृष्टीने आज हा प्रश्न तातडीचा आहे असे आम्हाला वाटत नाही. महाविकास आघाडीत आम्ही तीन पक्ष आहोत. आम्ही निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार आहोत. हे करत असताना आणखी काही लोकांना, विचारांना आम्हाला आमच्यासोबत घेण्याची ईच्छा आहे”, असे पवार यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग