Dhangar Reservation GR | “…तर राज्यातील 60-65 आमदार राजीनामा देतील”; महायुतीतल्या नेत्याचे मोठे वक्तव्य

मुंबई: Dhangar Reservation GR | राज्यात आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी सरकार (Mahayuti Govt) प्रयत्नशील आहे. दुसरीकडे धनगर समाजाला अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी सरकार जीआर काढण्याच्या भूमिकेत आहे.
मात्र असे झाले तर राज्यातील ६० ते ६५ आमदार राजीनामा देतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी केले आहे. सरकार कोणताही अभ्यास न करता जीआर काढत असेल तर आमचा त्याला विरोध असेल, अशी भूमिका झिरवळ यांची आहे.
धनगर समाजाला आरक्षण देण्यावरून महायुतीच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी आदिवासी आमदार आणि खासदारांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत पुढील भुमिका काय असावी याची चर्चा केली जाणार आहे, असे झिरवाळ यांनी सांगितले.
धनगर आणि धनगड (Dhangad) या जाती वेगळ्या असल्याचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court)
आणि उच्च न्यायालयाने (Bombay High Court) स्पष्ट केलेले आहे.
तरीदेखील राज्य सरकार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धनगर आरक्षणाचा जीआर काढत आहे,
याला आमचा विरोध आहे. राज्यात समाजाचे ६०-६५ आमदार आहेत.
जर सरकारने जीआर काढला तर सर्व आदिवासी आमदार राजीनामा देतील, असा इशारा झिरवळांनी दिला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग