Supriya Sule | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे विधान; म्हणाल्या – “कुठलेही पद हे…”

पुणे: Supriya Sule | मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विधानसभा निवडणुकीपूर्वी ठरवावा की नंतर? यावरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मतभेद पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा व्हावा, याबाबत वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बारामती शहर परिसरात सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचे फिक्स आमदार म्हणून पोस्टर लागले आहेत. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बॅनर लावल्याने कोणी मुख्यमंत्री होत नसतं. मायबाप जनता ठरवते. सशक्त लोकशाहीमध्ये जनतेच्या हातात सर्व ताकद असून या पोस्टरबाजीला आपण महत्त्व देत नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर तुम्ही ही संधी स्वीकारणार का असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कुठलेही पद हे महिला आणि पुरुष असे नसते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही अशी व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल जी महाराष्ट्राची आन-बान, शान राखून ठेवेल आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्याचे कर्तृत्व तिच्यामध्ये असेल मग ती महिला, पुरुष त्याच्यामध्ये कोणताही फरक मला जाणवत नाही “, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
येत्या काळात जर संधी मिळाली तर राज्याचा मुख्यमंत्री होणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना ‘मी जर तरच्या प्रश्नाला उत्तर देत नाही’, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी याबाबत अधिकचे बोलणे टाळले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग