Chakan Pune Crime News | भावानेच भावाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करुन केले साठेखत ! फसवणूक प्रकरणी वकिलासह सहा जणांवर गुन्हा दाखल

fraud

पिंपरी : Chakan Pune Crime News | वडिलोपार्जित सामाईक क्षेत्राचे साठेखत करताना भावाने आपल्या दुसर्‍या भावाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करुन फसवणूक केली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police) वकिलासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DALCvZjp1dB

याबाबत आनंदा दामु भोसले (वय ६०, रा़. पाडळी, वाडा रोड, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार खरेदी देणार गोविंदा ऊर्फ रामू दामु भोसले (रा. पाडळी, ता. खेड), खरेदी घेणार धिरज कुमार सुरेंद्र शेठीया (रा. चाकण, ता. खेड), साक्षीदार सुनिल गणपत वाळुंज (रा. शिरोली, ता. खेड), दीपक कोंडीभाऊ पाबळे (रा. कडघे, ता. खेड), तोतया व्यक्ती आणि अ‍ॅड. रवींद्र कर्नावट (रा. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात १७ डिसेबर २०२१ रोजी घडला. (Cheating Fraud Case)

https://www.instagram.com/p/DALittUJX7u

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पाडळी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. त्यात रामू भोसले याचे हिस्याचे ४१ आर क्षेत्राची विक्रीसाठी त्याने साठेखत तयार केले. या साठेखताला कायदेशीर मान्यता देण्यासाठी फिर्यादी यांची सही अंगठे आवश्यक होते. चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात फिर्यादी यांच्या जागी कोणीतरी दुसरी व्यक्ती उभी करुन त्यावर फिर्यादीचे खोटे व बनावट सह्या अंगठे करुन या दस्ताचा वापर करुन खरेदी खत करुन त्याद्वारे फेरफार करीत असताना आढळून आले. त्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार केली असून पोलीस उपनिरीक्षक तलवाडे तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DANPnaVJw9E

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Dhangar Reservation GR | “…तर राज्यातील 60-65 आमदार राजीनामा देतील”; महायुतीतल्या नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग

Sharad Pawar Vs Ajit Pawar | अजित पवारांच्या ६ आमदारांबाबत शरद पवारांचे प्लॅनिंग; राजकीय सामना रंगणार

Amol Balwadkar | भाजपचे नेते अमोल बालवडकर आयोजित महिला मेळाव्याला 4 हजार भगिनींची उपस्थिती; सर्व महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे फॉर्म भरले (Video)

You may have missed