Maharashtra Politics News | अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीतच उडाले खटके; शिंदे-फडणवीसांच्या हस्तक्षेपामुळे वाद निवळला

मुंबई : Maharashtra Politics News | महायुतीत (Mahayuti News) सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु आहे त्याची प्रचिती काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आली. काल (दि.२३) राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये अनुदानावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यात दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून खटके उडाले. दूध अनुदानाचा निर्णय आधीच व्हायला हवा होता, असे मत विखे- पाटील यांनी मांडले.
https://www.instagram.com/p/DAStwPYpszm
दुधाला ५ रुपये ऐवजी ७ रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यासाठी निधी कसा उभा करायचा अशी अजित पवार यांची भूमिका होती. आपत्कालीन निधीमधून हा देण्यात यावा अशीही मागणी बैठकीमध्ये करण्यात आली. या वादानंतर ७ रुपयांचे अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
https://www.instagram.com/p/DASsAO_Cbth
या बैठकीत अजित पवार म्हणाले, “गायीच्या दुधासाठी दूध उत्पादकांना लिटर मागे ७ रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता. अनेक बाबींचा आर्थिक भार वाढलेला आहे. हा निर्णय नंतरही घेता येईल. दूध उत्पादकांना आधीच विविध प्रकारे सरकार मदत करत आहे. निर्णयाला माझा विरोध नाही, पण आर्थिक बाबही तपासून पाहणे गरजेचे आहे.”
https://www.instagram.com/p/DASqPoMiKHO
अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर विखे पाटील यांनी देखील आपले मुद्दे मांडले. यावेळी दोघांमध्ये तू-तू ,मैं-मैं झाल्याचे पाहायला मिळाले. विखे -पाटील यांनी सांगितले की, ” दूध अनुदानाचा निर्णय आधीच व्हायला हवा होता. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतच हा प्रस्ताव यायला पाहिजे होता. दूध उत्पादकांना मदत करणे आवश्यक आहे”, असे म्हणत त्यांनी प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह धरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हस्तक्षेप करत प्रस्ताव मंजूर करण्यास सांगितले आणि अखेर हा प्रस्ताव मंजूर झाला. (Maharashtra Politics News)
https://www.instagram.com/p/DASoiSwiENg
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”