Pune District Court To Swargate Metro | पुणे मेट्रोचं मोदींच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन करण्याच्या हालचाली सुरु?; महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं

पुणे: Pune District Court To Swargate Metro | शहरात संभाव्य मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज स्वारगेट ते मंडई भुयारी मार्गाचे होणारे नियोजित लोकार्पण रद्द करण्यात आले. शहरात सुरु असलेल्या पावसामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. (PM Modi Pune Visit Cancelled)
https://www.instagram.com/p/DAXjsR2zQli
गणेशोत्सव काळातच पुण्यातील या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या कार्यक्रमासाठी २६ सप्टेंबर ही वेळ देण्यात आली होती.
https://www.instagram.com/p/DAXrMhDJ28P
परंतु आता पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे आता मेट्रो मार्गाचे उदघाटन लांबणीवर पडणार का? अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उदघाटनासाठी हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
https://www.instagram.com/p/DAXyHB-pGwI
“पंतप्रधान मोदी पुण्यातील टप्प्या-टप्प्याच्या मेट्रोच्या उद्घाटनासाठी येतात. यामुळे राज्याच्या, देशाच्या तिजोरीवर मोठा बोजा पडतो. याची कल्पना देखील या नेत्याला येत नाही. करोडो रुपयांचा चुराडा या दौऱ्यानिमित्ताने होणार होता आणि तो झाला आहे. त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून देखील उद्घाटने केली आहेत.
https://www.instagram.com/p/DAXwbm4CDuZ
त्यांनी त्याच पद्धतीने ही उद्घाटने केली असती तर लाखो रुपये वाचले असते. पण, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उद्घाटनाचा घाट घातला गेला. पुण्यासाठी काहीतरी करतोय असे दाखवण्याचा हा प्रयत्न होता”,अशी टीका आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/DAYB2g4C2Ef
विरोधकांकडून आता सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गणेश क्रीडा कला रंगमंचमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे समजते.
https://www.instagram.com/p/DAX6p0bJLYo
कारण स्वारगेट ते मंडई या मार्गावरील मेट्रो मागील काही दिवसांपासून तयार असून केवळ उद्घाटन कार्यक्रमामुळे लोकार्पण रखडले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करून लोकांसाठी ही सेवा उपलब्ध केली जाऊ शकते.
https://www.instagram.com/p/DAX3QlUpT7v
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’