Devendra Fadnavis On Ajit Pawar NCP In Mahayuti | ‘राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलेलं आमच्या मतदारांना अजिबात आवडलं नाही’, देवेंद्र फडणवीसांचे भाष्य; म्हणाले – ‘राजकारणात अनेकदा अशी परिस्थिती…’

ajit-pawar-devendra-fadnavis

मुंबई : Devendra Fadnavis On Ajit Pawar NCP In Mahayuti | अजित पवार यांना महायुतीत घेतल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला अशी चर्चा सध्या सुरु आहे. याबाबत संघानेही अशीच काहीशी भूमिका मांडली होती. अजित पवारांमुळे भाजप आरएसएस समर्थक नाराज झाले. याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर भाष्य केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

https://www.instagram.com/p/DAYSdaHJxVY

‘विरोधी पक्षनेता असताना तुम्ही ज्या पक्षावर सर्वाधिक हल्ले केले. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा (Irrigation Scam Maharashtra) . त्यांना तुम्ही सामील करून घेतले. लोक म्हणतात की, देवेंद्र फडणवीसांनी जे केले, ते भाजपाच्या मूळ विचारांना, भाजपाच्या एकनिष्ठ मतदाराला हे आवडलं नाही आणि त्यामुळे लोकसभेला तुमची अशी अवस्था झाली’, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता.

https://www.instagram.com/p/DAYKcPFpeVk

त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बघा, मला भाजप, आरएसएस कार्यकर्ते यांना सांगायचं नाही, तुम्हाला सांगायचं आहे. त्यांना मी सांगितलं आहे. भाजप आणि आरएसएस दोघांनाही मी सांगून बसलो आहे.”

https://www.instagram.com/p/DAYJHl5pG3r

ते पुढे म्हणाले, “मी इतकंच सांगेन की हो… मी ही गोष्ट मान्य करतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा सोबत घेतले. ते आमच्या मतदारांना आवडलं नाही. अजिबात आवडलं नाही. पण, आम्ही जेव्हा परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवली की, ते जेव्हा आमच्यासोबत आले, ते कोणत्या परिस्थिती आले.

https://www.instagram.com/p/DAX6p0bJLYo

कोणत्या परिस्थिती त्यांना सोबत घ्यावे लागले. आमच्या मतदारांच्या, आमचे जे कोअर लोक आहेत, त्यांच्या हे लक्षात आले आहे की, राजकारणात अनेकदा अशी परिस्थिती येते, जेव्हा तडजोड करावी लागते.”

https://www.instagram.com/p/DAXrMhDJ28P

“अनेक तडजोडी अशा असतात की, ज्या तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून आवडत नाहीत, पण कराव्या लागतात. अशा तडजोडी आम्ही या प्रकरणात केल्या. पण, आज मी विश्वासाने सांगू शकतो की, १०० टक्के नाही, पण ८० टक्के लोकांना आम्ही समजवण्यात यशस्वी झालो आहोत की, आम्ही हे का केले”, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. (Devendra Fadnavis On Ajit Pawar NCP In Mahayuti)

https://www.instagram.com/p/DAXleTqJepX

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed