Pune Crime Branch News | पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या सराईताकडून 4 लाख 61 हजारांचा गांजा जप्त

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | पुण्यात गांजा विक्रीसाठी (Ganja Selling) आलेल्या सराईताकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ४ लाख ५१ हजार रुपयांचा २२ किलो गांजा जप्त केला आहे. (Arrest In Ganja Case)

वैभव लक्ष्मण राठोड Vaibhav Laxman Rathod (वय १९, रा. ढवळकेवाडी, मालेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी – Gangakhed Parbhani) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड (PI Sudarshan Gaikwad) व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करता असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी विमाननगर परिसरातील निंबाळकरनगर (Nimbalkar Nagar, Viman Nagar) येथील रोडवर संशयास्पदरित्या थांबलेल्या वैभव राठोड याला पकडले. त्याच्याकडील सामानाची झडती घेतली असताना त्यात २२ किलो गांजा आढळून आला. विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (ACP Rajendra Mulik) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan) , पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, योगेश मांढरे, संदिप जाधव, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदिप शेळके, अझिम शेख, नितीन जगदाळे यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed