Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरण : टोळीप्रमुख गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड यांना 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

Somnath Gaikwad-Vanraj Andekar

फायरिंगचा आरोपींनी केला होता अगोदर सराव

पुणे : Vanraj Andekar Murder | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील टोळी प्रमुख गणेश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांना १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही आर कर्चे यांनी हा निर्णय दिला.

https://www.instagram.com/p/DAdXfp-CcAx

गणेश लक्ष्मण कोमकर Ganesh Laxman Komkar (वय ३७, रा. पालखी विठोबा चौक, भवानी पेठ) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड Somnath Sayaji Gaikwad (वय ४१, रा. आंबेगाव) याला २ सप्टेबर रोजी अटक केली होती. गणेश याची १५ सप्टेबर तर, सोमनाथची १६ सप्टेबरला न्यायालयीन कोठडी मंजुरी झाली होती. मोक्का न्यायालयाच्या (MCOCA Court) प्रॉडक्शन वॉरंटने पोलिसांनी दोघांना शुक्रवारी सायंकाळी येरवडा कारागृहातून (Yerawada Jail) ताब्यात घेऊन आज शनिवारी विशेष न्यायालयात तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (ACP Ganesh Ingle) यांनी हजर केले.

https://www.instagram.com/p/DAdVpIrCH93

सरकारी वकील राजेश कावेडिया (Adv Rajesh Kavediya) यांनी न्यायालयाला सांगितले की, वनराज आंदेकर याचा खून टोळी युद्धातून झाला आहे. तसेच गुन्हा करण्यामागे अन्य आणखी कोण सहभागी आहेत, त्याचा तपास करायचा आहे. यामध्ये आतापर्यंत २१ आरोपी अटक करण्यात आले आहेत. अटक आरोपी व हे टोळी प्रमुख यांची गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने रुजवात घालून एकत्रित तपास करायचा आहे.
या दोघा टोळी प्रमुखांनी संघटित गुन्हेगारी करुन स्थावर अथवा जंगम मालमत्ता प्राप्त केली आहे का याचा तपास करायचा आहे. हा गुन्हा करण्यापूर्वी गुन्ह्याची पूर्व तयारी म्हणून पिस्टलमधून फायरिंगाचा सराव केला होता. त्याबाबत दोन्ही आरोपीकडून त्या ठिकाणाबाबतची माहिती घेऊन तपास करायचा बाकी आहे. गुन्हा करताना १० कोयते वापरले होते, त्यापैकी ७ कोयते जप्त केले आहेत. अन्य ३ कोयते जप्त करायचे आहेत.

https://www.instagram.com/p/DAdT7L8p7Oj

दोन्ही आरोपी हे टोळीप्रमुख असून त्यांना गुन्हा करण्यासाठी कोणी प्रलोभन किंवा आमिष दिले होते का याचा तपास करायचा बाकी आहे. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांचे सीडीआर/ एसडीआर ची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास करायचा बाकी आहे.

https://www.instagram.com/p/DAdRtjGihkL

या गुन्ह्यात आरोपींनी कट रचल्यानंतर कोयते व पिस्टल मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश येथून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे पिस्टल आणण्याकरीता पैसे कोणी दिले. तसेच ज्या ठिकाणाहून व ज्या व्यक्तीकडून हत्यारे आणली आहेत. त्या संदर्भात तपास करुन आरोपी निष्पन्न करुन पुढील तपास करायचा बाकी आहे. त्यासाठी १० दिवस पोलीस कोठडीची मागणी केली.

https://www.instagram.com/p/DAdPb39iJrp

गणेश कोमकरच्या वतीने अ‍ॅड. पुष्कर पाटील (Adv Pushkar Patil), अ‍ॅड. आकाश कामठे (Adv Akash Kamthe), अ‍ॅड. ऋतुराज पासलकर (Adv Ruturaj Gaikwad) आणि सोमनाथ गायकवाडच्या वतीने विश्वजीत पाटील (Adv Vishwajeet Patil) यांनी काम पाहिले. न्यायालयाने दोघांना १ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

https://www.instagram.com/p/DAdNS2hiA32

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)