Prakash Ambedkar On Sharad Pawar | प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान; म्हणाले – ‘जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार…’

Prakash Ambedkar Sharad Pawar

मुंबई: Prakash Ambedkar On Sharad Pawar | सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनाही दौरे करतेवेळी आरक्षणाचा प्रश्न सतावत आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही आरक्षणाच्या मुद्यावरून घेरले जात आहे. दरम्यान मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) पहिला बळी शरद पवार ठरतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

https://www.instagram.com/p/DAczJOtJDbk

ओबीसी-मराठा आरक्षणाच्या (OBC-Maratha Reservation) मुद्द्याचा आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करीत आहेत. अशातच आता प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

https://www.instagram.com/p/DAc4RxEpR04

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शरद पवार हे केवळ मराठा नेते झाले आहेत अशी स्थिती मराठा आंदोलनामुळे निर्माण झाली आहे. आजपर्यंत ते मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंची मागणी टाळत आले आहेत. मात्र, रत्नागिरीच्या सभेत त्यांनी जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा पवार हे पहिला राजकीय बळी ठरतील.”

https://www.instagram.com/p/DAcxXzNJqtS

शिवाय जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले नाहीत, तर ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालत होते हे स्पष्ट होईल. जरांगे पाटील यांच्या मागणीला पवारांनी पाठिंबा दिल्यामुळे ओबीसी नेते बोलत होते त्याप्रमाणे पवार केवळ मराठ्यांचे नेते आहेत, यावर शिक्कामोर्तब झाल्याचंही आंबेडकर म्हणाले.

https://www.instagram.com/p/DAc1CHCJKCq

ते पुढे म्हणाले, “मराठवाड्यात जरांगे-ओबीसी असा उघड लढा आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात लढ्याची तीव्रता शाब्दिक नाही पण मानसिक आहे. विधानसभा निवडणूकीनंतर ओबीसी आरक्षण जाईल अशी त्यांची धारणा झाली आहे.

https://www.instagram.com/p/DAbbA6nCD0c

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील ओबीसींचे आरक्षण वाढवून मराठ्यांना देण्यासाठी अनुकूल आहेत. आता शरद पवार यांनीही जरांगेंच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे. त्यामुळे आता जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर ते पवारांच्याच इशाऱ्यावर चालत आहेत, असं समजू”, असे आंबेडकर म्हंटले आहेत.

https://www.instagram.com/p/DAbaFCPJsX8

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)