Raj Thackeray On Ladki Bahin Yojana | ‘…तर जानेवारीत कर्मचाऱ्यांचे पगार देणेही मुश्किल’, लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा इशारा

Raj-Thackeray

अमरावती : Raj Thackeray On Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभर चर्चा सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. मात्र या योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. (Raj Thackeray On Ladki Bahin Yojana)

https://www.instagram.com/p/DAdmULaCsGT

राज ठाकरे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत. तिजोरी रिकामी होईल, असं राज ठाकरे यांनी म्हंटले.

https://www.instagram.com/p/DAdi_yDpRi9

राज ठाकरे म्हणाले, “समाजातील कोणताही घटक फुकटात काहीही मागत नाही. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा, त्यांना रोजगार देऊन सक्षम केलं पाहिजे”, असं म्हणत राज ठाकरेंनी योजनेवर अप्रत्यक्ष टीका केली.

https://www.instagram.com/p/DAdg3Dwi_lf

पुढे बोलताना ते म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत. तिजोरी रिकामी होईल.”

https://www.instagram.com/p/DAdfBi5imA1

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)