Kothrud Assembly Constituency | कोथरूडमध्ये भाजप नेते अमोल बालवडकर यांना पसंती; कामामुळे आणि जनसंपर्कामुळे विधानसभेची उमेदवारी मिळेल, कोथरुडकरांचा विश्वास
पुणे: Kothrud Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. दरम्यान, कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांचे दौरे-भेटी वाढलेले आहेत. ‘जनसंवाद’ दौऱ्यादरम्यान नंदन स्पेक्ट्रा सोसायटी येथे भेट देऊन सोसायटीतील नागरिकांशी विविध विषयांवर बालवडकर यांनी संवाद साधला.
यावेळी सोसायटीतील नागरिकांनी बालवडकर यांचे स्वागत करत विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान, नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या बालवडकर यांनी जाणून घेतल्या. तसेच या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान त्याठिकाणच्या नागरिकांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून आमची अमोल बालवडकर यांनाच पसंती असल्याचेही बोलून दाखविले. कोथरूड परिसरात भाजपा पक्षबांधणीसाठी केलेल्या कामामुळे आणि जनसंपर्कामुळे पक्षाकडून बालवडकर यांनाच उमेदवारी जाहीर होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)