Pimpri Chinchwad Crime Branch News | रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सोबत घेऊन तडीपार गुन्हेगार करत होता मेडिकल शॉपमध्ये चोर्‍या; मेडिकल शॉप चोरीचे 6 गुन्हे उघडकीस

Pimpri Chinchwad Crime Branch

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch News | रात्रीच्या वेळी मेडिकल शॉपचे शटर उचकटून चोरी करण्याचे गुन्हे वाढले होते. त्याचा तपास करताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला या चोर्‍या तडीपार गुंड रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सोबत घेऊन करत असल्याचे आढळून आले. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे.

https://www.instagram.com/reel/DAfZk-ApHT1/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

चैतन्य शिवाजी रुपनर आणि गौरव ऊर्फ गणेश खोत (दोघे रा. चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चैतन्य रुपनर हा तडीपार असून त्याच्या वर चिंचवड व चिखली पोलीस ठाण्यात प्रत्येकी २ गुन्हे दाखल आहेत. गौरव ऊर्फ गणेश पंडित खोत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून चाकण पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यात तसेच चिंचवड पोलीस ठाण्यातील मारहाणीच्या गुन्ह्यात तो फरार होता.

https://www.instagram.com/p/DAfSw5Npxq6

रात्रीच्या वेळी शटर उचकटून घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने ते उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सूचना दिल्या होत्या. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी शटर उचकटून चोरी झालेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर पोलीस अंमलदार आशिष बनकर यांनी संशयित आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी चैतन्य बनकर आणि गौरव खोत यांना अटक केली. त्यांनी चिंचवड येथील मेडिकल शॉपमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्यांनी चिंचवड मधील ३, चिखलीमधील २ आणि वाकडमधील एका ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.

https://www.instagram.com/p/DAfXN8QpcLA

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस अंमलदार महेश खांडे, औदुंबर रोंगे, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहुल खारगे, नितीन लोखंडे, विशाल गायकवाड, सोमनाथ मोरे, नितीन उम्रजकर, प्रशांत पाटील,गणेश कोकणे, गणेश सावंत, हर्षल कदम, सुमीत देवकर, चंद्रकांत गडदे व समीर रासकर यांनी केली आहे. (Pimpri Chinchwad Crime Branch News)

https://www.instagram.com/p/DAfUjUiiMoZ

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)