Indapur Assembly Constituency | हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध, पवारांपुढे वाचला पाढा; शरद पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाले – ‘पुढचा आमदार आपलाच असेल’

Sharad Pawar-Harshvardhan Patil

बारामती : Indapur Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) लगबग सुरु झाली आहे. लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाने (Sharad Pawar NCP) मोठे यश मिळवल्याने पक्षाकडे अनके इच्छुकांची रांग लागल्याचे चित्र आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडीत (MVA Seat Sharing Formula) चर्चा सुरु आहेत. एकाच मतदारसंघात अनेकजण इच्छुक आहेत त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची हा पक्षनेतृत्वापुढे मोठा तिढा आहे.

https://www.instagram.com/p/DAfhi3uJAEV

दरम्यान इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा जवळपास महायुतीत (Mahayuti) अजित पवार गटाकडे गेली आहे. महायुतीत ही जागा तुतारी (Tutari) चिन्हाला सुटणार असल्याने अनेक इच्छुक शरद पवारांची भेट घेताना दिसत आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची मोठी गोची झाली आहे. एकतर तुतारी हाती घेणे किंवा अपक्ष लढणे हाच पर्याय आता पाटील यांच्यासमोर आहे.

https://www.instagram.com/p/DAfezBPCqod

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुकतीच शरद पवारांची गोविंद बागेत (Govindbaug Baramati) भेट घेतली. यावेळी इंदापूरच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी दशरथ माने (Dashrath Mane), आप्पासाहेब जगदाळे (Appasaheb Jagdale), प्रवीण माने (Pravin Mane) , महारुद्र पाटील, अशोक घोगरे, तेजसिंह पाटील, अमोल भिसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/DAfZk-ApHT1

यावेळी इंदापूर तालुक्यातील शिष्टमंडळाने शरद पवार यांच्याकडे निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली. ‘नको माजी, नको आजी आम्हाला हवा नवीन बाजी’, या शब्दात कार्यकर्त्यांनी पवार यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना तुतारीच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केल्याने पाटील यांच्यापुढे आता अडचणी वाढल्याचे चित्र आहे.

https://www.instagram.com/p/DAfXN8QpcLA

दरम्यान शरद पवार म्हणाले, “काही लोकांना आभाळाकडे बघून पाऊस पडेल की नाही ते समजते, आता अनेकांना वाटू लागले आहे की पाऊस पडेल त्या मुळे आपल्याकडील गर्दी वाढू लागली आहे. राज्यात कुठही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोक जमतात, लोकांनीच या निवडणूकीत जिंकायच ठरवले आहे, त्या मुळे यंदा चांगले निकाल लागतील यात शंका नाही.

https://www.instagram.com/p/DAfUjUiiMoZ

महाविकास आघाडी तीन पक्षांची आहे, प्रत्येक तालुक्यात सर्वेक्षण होईल, इच्छुकांना नाही तर कार्यकर्त्यांना विचारुन मगच निर्णय घेतला जाईल. आगामी दहा दिवसात हे काम पूर्ण होईल. माझा अंदाज आहे की ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान आयोग तारखा जाहीर करतील. १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल.”

https://www.instagram.com/p/DAfQcajpxPu

ते पुढे म्हणाले, “या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात आम्ही उमेदवार निश्चित करु. इंदापूरच्या बाबतीतही सर्वांशी विचारविनिमय करुन मगच निर्णय घेतला जाईल. यंदा इंदापूरमध्ये बदल घडेल असं वातावरण आहे, त्यामुळे निवडून येण्याची क्षमता विचारात घेत सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ”, अशी ग्वाही शरद पवार यांनी उपस्थितांना दिली.

https://www.instagram.com/p/DAfSw5Npxq6

“आघाडी म्हणून लढणार असल्याने काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागणार आहेत,
निवडणूकीत त्यांचेही काम करावे लागणार आहे. तुम्हाला तुमचे म्हणणे मांडायचा अधिकार आहे,
पण इंदापूरचा पुढचा आमदार आपलाच असेल हे लक्षात घेत सर्वांनी कामाला लागा”,
असा कानमंत्रच शरद पवार यांनी इंदापूरच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला आहे. (Indapur Assembly Constituency)

https://www.instagram.com/p/DAd1ELFia1B

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)