MVA Seat Sharing Formula | महाविकास आघाडीच्या जागावाटपात 20-22 जागांचा तिढा कायम, विधानसभेचा फॉर्म्युला जाणून घ्या

Mahavikas-Aghadi

लातूर : MVA Seat Sharing Formula | राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वेध आता लागले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. त्यासाठी पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे.

https://www.instagram.com/p/DAfq_C9Cqh0

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा प्रश्न सुटत आला असून अजून २० ते २२ जागांचा तिढा कायम असल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे. मराठवाड्यातील लातूर मतदारसंघातील (Latur Assembly) जागांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) जागेसाठी मागणी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

https://www.instagram.com/p/DAf7shdCxzj

याबाबतचा फॉर्म्युला सांगताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, सीटिंग आमदार ज्यांचा ती जागा तो पक्ष लढवणार अशी रणनीती असल्याचे त्यांनी सांगितले. या न्यायाने लातूर मधील औसा मतदारसंघाची जागा शिवसेनेची असल्याचं सांगत निलंगा, अहमदपूर विधानसभांच्या जागांसाठीही आम्ही आग्रही मागणी करीत आहोत, असे अंधारेंनी म्हंटले आहे. (MVA Seat Sharing Formula)

https://www.instagram.com/p/DAf3hZXCY4k

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)