Pune Crime Branch News | नेपाळहून पुण्यात आलेल्या मोक्कातील फरार गुन्हेगार जेरबंद ! तुरुंगातून फोन करुन देत होता धमकी

पुणे : Pune Crime Branch News | भेकराईनगरमध्ये (Bhekrai Nagar) आम्ही भाई असल्याचे सांगून १० ते १५ जणांनी दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली होती. या टोळीवर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली होती (Pune Police MCOCA Action). त्यांच्यातील मुख्य आरोपी नेपाळला पळून गेले होते. नेपाळहून विमानाने परत आल्याचे माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने (Pune Anti Extortion Cell) पुणे विमानतळावर (Pune Airport) दोघांना पकडले.
https://www.instagram.com/p/DAfSw5Npxq6
राहुल बाळासाहेब तुपे Rahul Balasaheb Tupe (वय ३४, रा. हडपसर – Hadpasar) आणि सागर रमेश धुमाळ Sagar Ramesh Dhumal (वय ४३, रा. महादेवनगर, मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याबाबत अजय अशोक जगदाळे (वय ३०, रा. पुरंदर कॉलनी, पापडे वस्ती, भेकराईनगर) यांनी हडपसर पोलिसांकडे २५ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली होती.
https://www.instagram.com/p/DAfXN8QpcLA
मिलींद तुपे याला फिर्यादी यांनी चार ते पाच वर्षांपूर्वी जमीन विकली होती. मिलिंद तुपे याच्याकडे विक्री केलेल्या जमिनीचे पैसे मागितले असता तो फिर्यादीला पैसे देणार होता. परंतु, मिलिंद तुपे याचा मित्र राहुल तुपे याने कोल्हापूर येथील तुरुंगातून फोन करुन धमकी दिली की, मिलिंद तुपे याचेकडे पैसे मागू नको, नाहीतर तुला मारुन टाकीऩ तेव्हा पासून त्यांच्यात वाद होता. राहुल तुपे याच्याविरोधात खून, तसेच खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
२४ ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादी हे घरी आल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास राहुल तुपे, सचिन तुपे व त्यांच्या १० ते १५ साथीदारांनी घरासमोर पार्क केलेली हुंडाई क्रेटा, अॅल्टो कारची तोडफोड करुन दहशत माजविली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल तुपे व सागर धुमाळ हे फरार झाले होते. आरोपींबाबत खंडणी विरोधी पथकाने माहिती काढल्यावर ते नेपाळ येथून लखनौ आले असून लखनौ हून पुण्यात विमानाने येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय कुंभार (PI Vijay Kumbhar) यांनी पथक तयार करुन रवाना केले. विमानतळावर जाऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले व पुढील तपासासाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले.
https://www.instagram.com/p/DAfZk-ApHT1
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar),
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade),
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (DCP Nikhil Pingle),
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (ACP Rajendra Mulik) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे (API Prashant Sande), पोलीस उपनिरीक्षक गौरव देव (PSI Gaurav Dev), पोलीस अंमलदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, दिलीप गोरे, अमोल घवटे, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, गणेश खरात, पवन भोसले, चेतन आपटे, अजिनाथ येडे, रुपाली कर्नावर, आशा कोळेकर यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/DAfUjUiiMoZ
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)