Pune Rural Police News | दोघा गुंडांकडून 5 गावठी पिस्तुले, 4 जिवंत काडतुसे जप्त ! ग्रामीण पोलिसांनी महिन्याभरात 17 पिस्तुले व 29 जिवंत काडतुसे केली जप्त (Video)

Pune Rural Police

पुणे : Pune Rural Police News | गावठी कट्टे कमरेला लावून फिरणार्‍या दोघांना शिरुन पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ५ पिस्तुले व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अनिकेत विलास गव्हाणे (वय २०, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २०, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गावठी पिस्तुलाची विक्री करुन जास्त पैसे कमविता येतील, या कारणावरुन त्यांनी एक महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील सेंधवा येथून पाच पिस्तुले आणल्याचे सांगितले. अनिकेत गव्हाणे याच्याविरुद्ध शरीराविरुद्ध एक गुन्हा बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल आहे.

https://www.instagram.com/reel/DAkmpeipgdY/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

शिरुरनजीक बायपास रोडलगत असणारे दि स्पॉट नाना हॉटेलजवळ दोघे जण कमरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली. त्यानुसार शिरुर पोलिसांनी (Shirur Police) दोघांना पकडले. अनिकेत गव्हाणे यांच्या कमरेला दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे तर मंगेश खुपटे याच्या कमरेला तीन पिस्तुले व २ जिवंत काडतुसे आढळून आली.

https://www.instagram.com/p/DAkal4qJcHk

याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (SP Pankaj Deshmukh) यांनी सांगितले की, सप्टेबर २०२४ मध्ये स्थानिक गुन्हे शाखा, शिरुर पोलीस ठाणे, शिक्रापूर पोलीस ठाणे, वालचंदनगर पोलीस ठाणे, यवत पोलीस ठाणे व हवेली पोलीस ठाण्याकडून गावठी पिस्तुल बाळगणारे व विक्री करणार्‍यांवर कारवाई करुन एकूण १७ पिस्तुले व २९ जिवंत काडतुसे जप्त करुन मोठी कारवाई करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DAjErLWCf33

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस अंमलदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, विजय शिंदे, परशुराम सांगळे, निरज पिसाळ, निखील रावडे, रधुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांनी केली आहे. (Pune Rural Police News)

https://www.instagram.com/p/DAjDQ41i1QY

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)

You may have missed