BRS Party – Sharad Pawar NCP | शरद पवार गटात संपूर्ण बीआरएस पक्ष विलीन होणार? राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरु

मुंबई : BRS Party – Sharad Pawar NCP | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) एक मोठी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांना मोठा धक्का मानला जात आहे.
https://www.instagram.com/p/DAkk8drJ6Sr
राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी येत्या ६ तारखेला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी माहिती आहे. राज्यातील बीआरएस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. यानंतर ही माहिती समोर आली आहे.
https://www.instagram.com/p/DAke8lGCF0i
दरम्यान, ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यावेळी के चंद्रशेखर राव यांनी स्वतः नागपूरमध्ये येऊन स्वतःच्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. मात्र आता महाराष्ट्रात त्यांच्या पक्ष गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. (BRS Party – Sharad Pawar NCP)
https://www.instagram.com/p/DAkdEHzJUMQ
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)