Sunil Tatkare On Sharad Pawar | ‘शरद पवारांना हलक्यात घेणे म्हणजे आत्मघात’, महायुतीच्या बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – ‘आम्हाला ही जाणीव आहे की, समोर शरद पवार…’

Sunil Tatkare - Sharad Pawar

मुंबई : Sunil Tatkare On Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेला मोठे यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास वाढला आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) १० पैकी ८ खासदार निवडून आले. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुकांची मोठी इन्कमिंग राष्ट्रवादी पक्षात सुरु आहे.

https://www.instagram.com/p/DAkk8drJ6Sr

शरद पवारांचा विधानसभेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र दौरा सुरु आहे. शेतकरी मेळावे आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जात यंदा विधानसभेला बदल करायचा असल्याचे आवाहन ते जनतेला करताना दिसत आहेत. उमेदवारांची चाचपणी पक्षाकडून करण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटातील (Ajit Pawar NCP) अनेक पदाधिकारी शरद पवार गटात दाखल झाले आहेत. तर काही नेते तुतारी हातात घेण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहात आहेत.

https://www.instagram.com/p/DAkdEHzJUMQ

अशातच आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाचे विधान केले आहे. शरद पवारांच्या अनुभवाचे महायुतीला आव्हान वाटतंय का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “कसं आहे की, शेवटी निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याला कुणाला हलक्यात घेता येत नाही. त्यातल्या त्यात शरद पवार साहेबांसारख्या नेतृत्वाला हलक्यात घेणे म्हणजे आत्मघात आहे. त्यामुळे आम्ही परिणाम आणि परिमाण दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करून निवडणुकीची नीती तयार करतोय”, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAkal4qJcHk

“आज महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेले शरद पवार एकच आहेत. कारण त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांपासूनचे राजकारण पाहिले, अनुभवले आहे. त्या स्थित्यंतरांमध्ये ते आहेत. त्यामुळे त्यांच्या इतका पाठीशी अनुभव असलेला नेता या महाराष्ट्रात कुणी नाहीये, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग, या संबंध निवडणुकीच्या माध्यमातून ते करत आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही”, असे तटकरे यांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DAjErLWCf33

ते पुढे म्हणाले, “आम्हाला ही जाणीव आहे की, समोर शरद पवार आहेत. काँग्रेस आहे.
काँग्रेसला एक नेता नसला, तरी मतदार आहे.
उद्धवजी आहेत. त्या सगळ्यांचे भान आणि जाणीव ठेवून आम्ही आमची रणनीती शांतपणे आखतोय.
अनेक वेळा हेही होत असते की, समोरून सुद्धा आपापल्या पद्धतीने काहीतरी बांधणी होत असते.

https://www.instagram.com/p/DAjB7M1ijQd

आज आम्ही सगळेजण जे काही आहोत, लोकसभेच्या वेळी आलेले अनुभव लक्षात घेऊन,
महायुती म्हणून त्यावेळी आमच्याकडून काही उणीवा राहिल्या , त्या आमच्या सर्वांच्या लक्षात आल्या आहेत.
शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सर्वजण त्या सगळ्या उणीवा दूर करत या निवडणुकीची रणनीती आखत आहोत”, असे तटकरे यांनी म्हंटले.

https://www.instagram.com/p/DAi-ViLiUAS

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)