Harshvardhan Patil | शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी; पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील राज्य पातळीवर सक्रिय होणार

Harshvardhan-Patil-Sharad-Pawar

इंदापूर: Harshvardhan Patil | भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महायुतीच्या जागावाटपात (Mahayuti Seat Sharing Formula) इंदापूर विधानसभा मतदासंघ (Indapur Assembly) अजित पवार गटाला जाणार हे जवळपास निश्चित होतं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी (Tutari) हाती घेण्याचा निर्णय घेतला. (Harshvardhan Patil)

पक्ष प्रवेशाच्या वेळीच हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारी बाबत शरद पवार आणि जयंत पाटील यांनी तसे संकेत दिले होते. दरम्यान आता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

हर्षवर्धन पाटील यांची आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाकडून याबाबतचे नियुक्तीपत्र देताना हर्षवर्धन पाटील यांना उद्देशून म्हटलं आहे की, “सप्रेम नमस्कार, आपणास कळविण्यात आनंद होत आहे की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) मध्ये नियुक्ती करण्यात येत आहे.

या संसदीय मंडळाची बैठक शनिवार, दि. १९/१०/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वा. राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४००००१ येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस आपण उपस्थित राहावं,” असे आवाहन पाटील यांना यांना करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवल्याने
आता ते पुन्हा एकदा राज्य पातळीवर सक्रिय होताना पाहायला मिळू शकतात.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Daron Acemoglu News | अभिमानास्पद ! नोबेल पारितोषिक विजेत्याने ‘पुणे न्यूज’ची बातमी
शेअर करुन आपल्याला पारितोषिकाने सन्मानित केल्याची केली घोषणा

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत वादंग! ‘काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका’,
भाजपचा शिवसेना शिंदे गटाला इशारा

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज;
म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’

Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

You may have missed