Pune Crime News | मध्यरात्री नदीपात्रात पडलेल्या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी दिले जीवदान

Firefighters gave life to a young man

पुणे : Pune Crime News | मध्यरात्री नदीपात्रात पडलेल्या तरुणाला रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंगचा वापर करुन अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले.

महापालिका भवन येथील शिवाजी पुलालगत पाण्यामध्ये एक तरुण पडला असल्याची वर्दी मध्यरात्री १२ वाजून ३७ मिनिटांनी अग्निशामक दलाला मिळाली. तातडीने कसबा पेठ अग्निशमन केंद्रातील गाडी रवाना झाली.

जवान घटनास्थळी पोहोचताच त्यांनी नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहामध्ये तरुण असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करुन जवानांनी सुमारे पाच मिनिटात या तरुणाला सुखरुप बाहेर काढले. यावेळी जीवरक्षक राजू काची याचे सहकार्य मिळाले. सोमनाथ निशाद (वय २७, मुळ रा. उत्तर प्रदेश) हा तरुण पाण्यात कसा पडला, याची नेमकी माहिती मिळू शकली नाही.


या कामगिरीत कसबा अग्निशमन केंद्रातील वाहनचालक संतोष चौरे तसेच फायरमन हरिश बुंदेले, राजू जगदाळे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेंद्र महाडिक, आतिश नाईकनवरे, सनी लोखंडे यांनी भाग घेतला.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Harshvardhan Patil | शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी;
पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील राज्य पातळीवर सक्रिय होणार

Daron Acemoglu News | अभिमानास्पद ! नोबेल पारितोषिक विजेत्याने ‘पुणे न्यूज’ची बातमी
शेअर करुन आपल्याला पारितोषिकाने सन्मानित केल्याची केली घोषणा

You may have missed