Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

nana-patole-uddhav-thackeray

नागपूर: Maharashtra Assembly Election 2024 | दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या (MVA Seat Sharing Formula) मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी रंगल्याचे चित्र आहे. दक्षिण नागपूरचे काँग्रेस पदाधिकारी (Congress), कार्यकर्ते शिवसेना ठाकरे पक्षावर (Shivsena Thackeray Group) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर प्रचंड नाराज दिसत आहेत.

ज्या उमेदवारासाठी शिवसेना ठाकरे पक्ष दक्षिण नागपूर मतदारसंघ मागत आहे, त्या प्रमोद मानमोडे यांना मागील निवडणुकीत चार हजार मतं मिळाले होते. त्यांना त्यांचेच कर्मचारी मतं देत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही स्थिती ओळखावी, अशी विनंती ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

आमचा आमच्या पक्षश्रेष्ठींवर विश्वास असून नाना पटोले (Nana Patole) दक्षिण नागपूर मतदार संघ काँग्रेससाठी खेचून आणतील, असा विश्वासही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस गल्लोगल्ली, घरोघरी पोहोचलेला पक्ष आहे.
तर शिवसेनेचा इथे संघटन सुद्धा नाही.
त्यामुळे दक्षिण नागपूर मतदारसंघ काँग्रेसलाच मिळायला हवा,
अन्यथा काँग्रेसचे पदाधिकारी सामुहिक राजीनामा देतील आणि शिवसेनेच्या उमेदवारासाठी
आम्ही बूथ सुद्धा लावणार नाही, मग त्यांनी मत घेऊन दाखवावे,
असा स्पष्ट इशारा काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed