Maharashtra Assembly Election 2024 | भाजपने शिवसेना शिंदे गटाचे पाच मतदारसंघ खेचले; भाजपच्या रणनितीचा परिणाम इतर जागांवरही होणार?

eknath shinde-devendra fadnavis

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे (BJP First List For Maharashtra Assembly Election 2024). यामध्ये ९९ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान भाजपने शिवसेना शिंदे गटाचे पाच मतदारसंघ खेचले आहेत. मागेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आता जागावाटपात तुम्ही थोडा त्याग करा असे म्हंटल्याची चर्चा होती.

त्यानुसार आता धुळे शहर, अचलपूर, देवळी, नालासोपारा, उरण हे मतदारसंघ शिवसेनेचे होते. पण आता या मतदारसंघात भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. अचलपूर मधून अतुल तायडेंना भाजपने यंदा उमेदवारी दिली आहे. याच मतदारसंघातून सुनिता फिसके या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. देवळी मतदारसंघात भाजपकडून राजेश बकानेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

धुळे शहरात भाजपकडून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या मतदारसंघात शिवसेनेचे हिलाल माळी हे उमेदवार होते. उरणमधून भाजपने महेश बालदींना उमेदवारी दिली आहे.
या मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर हे २०१९ ला उमेदवार होते.
नालासोपाऱ्यातून भाजपचे राजन नाईक हे उमेदवार आहेत. २०१९ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप शर्मा उमेदवार होते.

भाजपच्या या रणनितीचा परिणाम भविष्यातल्या जागांवरही होणार असल्याचे म्हटले जातेय.
यामध्ये पालघर, बोईसर यांसारख्या जागांचा समावेश असल्याच्या चर्चा आहेत.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed