Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल; धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’
पुणे : Ravindra Dhangekar | आचार संहिता लागू झाली असतानाही कसब्याचे (Kasba Assembly) आमदार रवींद्र धंगेकर यांचे छायाचित्र, नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले दिवाळी कीट वाटप केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police) हिंदमाता प्रतिष्ठान विरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला आहे. हिंदमाता प्रतिष्ठान (Hindmata Pratishthan) ही आमदार रवींद्र धंगेकर यांची संस्था आहे. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. (Ravindra Dhangekar)
हिंदमाता प्रतिष्ठानकडून नागरिकांना सुगंधी उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा साहित्याचे कीट वाटण्यात येत होते. एका टेंपोमधून हे कीट नेऊन वाटप सुरु असल्याची तक्रार पोलीस आणि निवडणुक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर आयोगाचे पथक घटनास्थळी पोहचले. साहित्य असलेला टेम्पो समर्थ पोलीस ठाण्यात आणण्यात आला. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला.
याबाबत पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल (Sandeep Singh Gill) यांनी सांगितले, ‘‘या प्रकरणी निवडणुक आयोगातील अधिकार्यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’’
याबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले, ‘‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून दरवर्षी आमचा मित्र परिवार गरजु कुटुंबाना ‘आनंदाची दिवाळी’ भेट देतो़ त्याप्रमाणे यंदाही गरजू लोकांना आमचा मित्रपरिवार ‘आनंदाची दिवाळी’ देत असवा़ कुठल्याही प्रकारच्या वस्तूंचे वाट करण्यात माझा व्यक्तिश: सहभाग नाही़ जर माझा मित्र परिवार आनंदाची दिवाळी वाटप करतोय म्हणून त्यांना रोखत असाल तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमधून होणाºया वस्तूंचे वाटप कोण रोखणार?
माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री
यांच्यावरही गुन्हा नक्कीच दाखल होऊ शकतो़’’
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?