Pune Pimpri Chinchwad Crime News | भररस्त्यात दहशत माजविणार्‍यांना जाब विचारल्याने कटरने वार करुन खुनाचा प्रयत्न

marhan

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | भररस्त्यात येणार्‍या जाणार्‍यांना कटरचा धाक दाखवुन मारहाण करणार्‍या दोन तरुणांना असे करु नका, लोक घाबरतात, असे सांगितल्याच्या रागातून आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणून तरुणाचा गळ्यावर कटरने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)

भाऊसाहेब हरी दगडे (वय ३७, रा. मल्हार कॉलनी, रहाटणी फाटा, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना थेरगाव येथील दिप्ती मेडिकल व पाकिजा बेकरीच्या मध्ये फुटपाथवर १२ ऑक्टोंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनगरबाबा मंदिराकडून फुटपाथवरुन घरी जात होते. पाकिजा बेकरी ते दिप्ती मेडिकलच्या मध्ये असलेल्या जागेत फुटपाथवर दोन २० -२२ वर्षाची मुले येणार्‍या जाणार्‍या लोकांना त्यांच्याकडे असलेल्या कटरचा धाक दाखवून मारहाण करत होते. तसेच बाजूला असलेल्या सलून दुकानदाराला शिवीगाळ करुन दुकान बंद करण्यास सांगत होते. त्यावेळी फिर्यादी हे तेथे जाऊन त्यांना असे करु नका, लोक घाबरतात, असे बोलले.

त्यावर त्यांच्यातील एक जण ‘‘ तु कुठला भाई आहेस, आम्ही इथले भाई आहेत, तुला माहिती नाही काय, मी कोणाचा माणूस आहे. मी रवि मल मामाचा भाचा आहे. तू येथून निघून जा नाही तर तुझी विकेट टाकू’’असे बोलून त्याने फिर्यादीस हाताने मारहाण केली. दुसर्‍याने हातातील कटर फिर्यादीच्या गळ्यावर मारुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक एन एम सूर्यवंशी (PSI N M Suryavanshi) तपास करीत आहेत.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल; धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed