Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले; सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण

Mumbai-High-Court

मुंबई: Mumbai High Court News | शिवसेनेच्या (Shivsena) बंडानंतर चर्चेत असलेल्या ‘५० खोके एकदम ओके’ घोषणेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निकाल दिला आहे. अपेक्षाभंग केल्यास उद्रेक तर होणारच असे म्हणत ‘५० खोके एकदम ओके’ ची घोषणा देणे गुन्हा नाही असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. तसेच याबाबतचा एफआयआरही रद्द करण्यात आला आहे. (50 Khoke Ekdum Ok)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली झालेले शिवसेनेतील बंड राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत राहिले. शिंदेंच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या नेत्यांसह कट्टर शिवसैनिकांनी दिलेली ५० खोके, एकदम ओके ही घोषणा चांगलीच गाजली. (Mumbai High Court News)

शिंदेंसोबत असलेले नेते जिथे जातील तिथे त्यांना ठाकरेंच्या शिवसैनिकांचा सामना करताना ही घोषणाबाजी ऐकायला मिळायची. ५० खोके घेऊन ही बंडखोरी केल्याची टीका शिंदेसेनेच्या नेत्यांवर वारंवार होत आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यासोबतही असाच प्रकार घडला होता. मंत्री अब्दुल सत्तार हे जळगाव जिह्याच्या दौऱ्यावर आले असताना ऍड. शरद माळी यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सत्तार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कापूस व रिकामे खोके फेकले होते. यावेळी ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या, असा ठपका ठेवत शिवसैनिकांसह वकील शरद माळी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हा गुन्हा रद्द करण्यासाठी ऍड. शरद माळी यांनी याचिका दाखल केली होती.
याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
ही कारवाई म्हणजे सामाजिक शांतता कायम ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केल्याचा पोलिसांनी
दावा केला होता. यावरुनच कोर्टाने नाराजी व्यक्त केली.
प्रत्येक आंदोलन हे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी केलेले नसते,
असे खडेबोल खंडपीठाने पोलिसांना सुनावले.

सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच, असे कोर्टाने म्हटले आहे.
तसेच शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हाही उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल; धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?